हिंदू पूजाऱ्याची हत्या, लाखोंचा इनाम; कोण होता खालिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर?

Khalistani Terrorist Hardeep Singh Nijjar: कॅनडा झपाट्याने खलिस्तानी दहशतवाद्यांचे सुरक्षित आश्रयस्थान बनत आहे.
Khalistani Terrorist Hardeep Singh Nijjar
Khalistani Terrorist Hardeep Singh NijjarDainik Gomantak

Khalistani Terrorist Hardeep Singh Nijjar: कॅनडा झपाट्याने खलिस्तानी दहशतवाद्यांचे सुरक्षित आश्रयस्थान बनत आहे. हे खलिस्तानी दहशतवादी भारतात खून आणि खंडणीसारख्या अनेक गुन्हेगारी कारवायांमध्ये सामील आहेत.

यापैकी एक नाव खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरचे आहे, ज्याची या वर्षी जूनमध्ये ब्रिटिश कोलंबियामध्ये अज्ञात दुचाकीस्वारांनी गोळ्या झाडून हत्या केली. यातच, निज्जर हत्येप्रकरणी कॅनडाने एका भारतीय राजनयिकाची हकालपट्टी केली आहे.

10 लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते

गेल्या वर्षी भारताच्या राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) निज्जरला दहशतवादी घोषित करुन 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते, तर 2020 मध्ये सुरक्षा संस्थेने त्याला दहशतवादी म्हणून घोषित केले होते.

45 वर्षीय खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर 1997 मध्ये पंजाबमधील जालंधरच्या पुरा गावातून कॅनडामध्ये पोहोचला होता. यानंतर त्याने खलिस्तानी समर्थकांसह भारताविरुद्ध (India) गरळ ओकण्यास सुरुवात केली होती. निज्जर हा गुरु नानक शीख गुरुद्वाराचा अध्यक्षही होता.

Khalistani Terrorist Hardeep Singh Nijjar
Canada Khalistan Referendum: धक्कादायक! खलिस्तानसाठी कॅनडामध्ये मतदान; भारताच्या इशाऱ्यानंतर ट्रुडो सरकारचे दुर्लक्ष

हिंदू पूजाऱ्याची हत्या

बंदी घातलेल्या खलिस्तान टायगर फोर्सचा (KTF) प्रमुख निज्जर हा न्यूयॉर्कमधील शीख फॉर जस्टिसचा नेता गुरपतवंत सिंग पन्नू याच्यासह कॅनडातील खलिस्तान समर्थक जनमत संग्रहाचा प्रमुख नेता होता.

कॅनडात राहणारा निज्जर सक्रियपणे काम करत होता. अनेक वर्षांपासून भारतविरोधी कारवायांमध्ये तो सहभागी होती. निज्जरवर 2021 मध्ये पंजाबमधील (Punjab) जालंधर येथे टार्गेट किलिंग केल्याचा आरोप होता.

यात एका हिंदू पूजाऱ्याची हत्या झाली होती. निज्जरच्या सांगण्यावरुन पूजाऱ्याच्या हत्येचा कट खलिस्तान टायगर फोर्सने रचला होता.

निज्जरच्या हत्येमागचं कारण काय?

माझ्या जीवाला धोका असल्याचे कॅनेडियन सिक्युरिटी इंटेलिजन्स सर्व्हिस (सीएसआयएस) ने मला सांगितले होते, असे निज्जरने खुनाच्या काही दिवस आधी मीडियाला सांगितले होते. निज्जरची हत्या सुपारी देऊन झाल्याचंही समोर आलं आहे.

त्याचवेळी, जून 1985 मध्ये एअर इंडिया बॉम्बस्फोटातील आरोपी रिपुदमन सिंग मलिकच्या हत्येचा बदला म्हणून निज्जरची हत्या झाल्याचेही सांगण्यात आले. मलिकची त्याच्या सरे कार्यालयाबाहेर दोन बंदूकधाऱ्यांनी हत्या केली होती.

Khalistani Terrorist Hardeep Singh Nijjar
Khalistan March: भारताच्या मित्रराष्ट्रांच्या अडचणीत वाढ! खलिस्तानी संघटनांच्या प्रदर्शनाविरुद्ध काय घेणार भूमिका?

दुसरीकडे, सरे येथील पवित्र शीख धर्मग्रंथाच्या छपाईबाबत निज्जर याचा मलिक यांच्याशी वाद होता. नरेंद्र मोदी सरकारची स्तुती केल्याने मलिक खलिस्तान्यांच्या निशाण्यावर होते. निज्जरची हत्या भारतीय एजन्सीने केल्याचा आरोप काही खलिस्तान समर्थक संघटना करतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com