भारताच्या मदतीला सरसावल्या कॅनडाच्या सर्वात तरुण महिला कॅबिनेट मंत्री
Canadas Minister of International Development Karina Gould announces 10 million funding for India

भारताच्या मदतीला सरसावल्या कॅनडाच्या सर्वात तरुण महिला कॅबिनेट मंत्री

कॅनडा: भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. मागील काही आठवड्यांपासून रोज लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत, त्यामुळे आता जगाचे लक्ष भारताकडे वळले आहे. भारतासाठी जगभरातून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. अनेक देशांनी पुढे येवून भारताला मदत करण्यासाठी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.

अशातच आज कॅनडाच्या आंतरराष्ट्रीय विकास मंत्री करीन गुल्ड यांनी भारतासाठी मदत घोषित केली आहे. जगभर पसरलेल्या कोरोनाच्या लढाईदरम्यान कॅनडाने भारताला दहा मिलियन डॉलर्सची मदत जाहीर केली आहे. भारताला कोरोना काळात मदत करणासाठी पहिल्यांना एका महिलेने पुढाकार घेतला आहे. करीन गुल्ड या कॅनेडियन इतिहासात सर्वात तरुण महिला कॅबिनेट मंत्री आहेत.

दरम्यान माहिती तंत्रज्ञानातील क्षेत्रातील अग्रेसर असणाऱ्या गुगलने (Google) भारतासाठी 135 कोटींच्या मदतीची घोषणा केली होती. त्याचबरोबर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी कोरोना परिस्थिती बघून चिंताही व्यक्त केली होती. 

भारतातील कोरोनासंदर्भातील चिंताजनक परिस्थिती पाहून नागरीकांपासून ते नेत्यांपर्यंत सगळ्यांनाच धक्का बसला आहे. शासन आणि प्रशासन याकडे काळजीपूर्वक लक्ष देत आहे. देशात आरोग्ययंत्रणा आणखी बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.  दरम्यान काही राज्यांमध्ये कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाउॉन ही लावण्यात आले आहे. बाहेर देशातून येणाऱ्यांना कोरोना टेस्ट अनिवार्य केली आहे. त्याचबरोबर इतर राज्यातून येणाऱ्यांना आता इ-पास आवश्यक केलाय.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com