
Canadian MP Jagmeet Singh: फुटीरतावादी कारवायांचे समर्थन करत असल्याचे बोलले जाणारे कॅनडाचे खासदार जगमीत सिंग यांनी पुन्हा एकदा भारताविरोधात चिथावणीखोर वक्तव्य केले आहे.
कॅनडाच्या या खासदाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात गरळ ओकली आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी सोमवारी संसदेत एका शीख कार्यकर्त्याच्या हत्येत भारत सरकारचा हात असल्याचे वक्तव्य केले होते.
ट्रुडो यांच्या आरोपांच्या चौकशीदरम्यान तेथील सरकारने एका उच्च भारतीय राजनयिक अधिकाऱ्याची देशातून हकालपट्टी केली.
खलिस्तान समर्थक शीख नेता हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येमध्ये भारत सरकारचा हात असल्याच्या आरोपांची चौकशी कॅनडाची गुप्तचर संस्था करत असल्याचे ट्रूडो यांनी संसदेत सांगितले होते.
ब्रिटिश कोलंबियातील सरे येथील शीख सांस्कृतिक केंद्राबाहेर 18 जून रोजी निज्जरवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.
दरम्यान, कॅनडाचे (Canada) खासदार जगमीत सिंग यांनी पंतप्रधान मोदींना इशारा दिला आहे. जगमीत यांनी ट्विट करत म्हटले की, "आज आम्हाला कळले की, भारत सरकारच्या एजंटनी हरदीप सिंग निज्जरची हत्या केली. कॅनेडियन लोकांसाठी ही एक शोकांतिका आहे.
मी शपथ घेतो की, नरेंद्र मोदींना जबाबदार धरण्यासह न्याय मिळवण्याच्या प्रयत्नात कदापि कमी पडणार नाही.' कॅनडात शिखांची लोकसंख्या 7,70,000 पेक्षा जास्त आहे. हा आकडा देशाच्या एकूण लोकसंख्येच्या दोन टक्के आहे.
कॅनडाने एका भारतीय अधिकाऱ्याची हकालपट्टी केल्यानंतर काही तासांनंतर, भारताने (India) मंगळवारी कॅनडाच्या राजनयिक अधिकाऱ्याला निष्कासित करण्याची घोषणा केली. कॅनडाचे भारतातील उच्चायुक्त कॅमेरॉन मॅके यांना परराष्ट्र मंत्रालयाने बोलावले होते.
दरम्यान, भारत आणि कॅनडामधील संबंध बिघडत असल्याचे या पावलांमुळे दिसून येते. याच्या काही दिवसांपूर्वीच, दोन्ही देशांनी द्विपक्षीय मुक्त व्यापार कराराबाबत चर्चा थांबवण्याचा निर्णय घेतला होता.
कॅनडातील खलिस्तान समर्थक घटकांच्या वाढत्या कारवायांमुळे दोन्ही देशांमधील संबंध तणावपूर्ण बनले आहेत.
माझ्या जीवाला धोका असल्याचे कॅनेडियन सिक्युरिटी इंटेलिजन्स सर्व्हिस (सीएसआयएस) ने मला सांगितले होते, असे निज्जरने खुनाच्या काही दिवस आधी मीडियाला सांगितले होते. निज्जरची हत्या सुपारी देऊन झाल्याचंही समोर आलं आहे.
त्याचवेळी, जून 1985 मध्ये एअर इंडिया बॉम्बस्फोटातील आरोपी रिपुदमन सिंग मलिकच्या हत्येचा बदला म्हणून निज्जरची हत्या झाल्याचेही सांगण्यात आले. मलिकची त्याच्या सरे कार्यालयाबाहेर दोन बंदूकधाऱ्यांनी हत्या केली होती.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.