नासाने मंगळ ग्रहावर पाठवलेल्या हेलिकॉप्टरचा आवाज केला कैद: पहा व्हिडिओ

दैनिक गोमंतक
रविवार, 9 मे 2021

अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था नासाने मंगळ ग्रहावर पाठवलेल्या हेलिकॉप्टरचा आवाज कैद केला आहे. नासाच्या मंगळ मोहिमेपैकी ही सर्वात यशस्वी मोहीम मानली जात आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था नासाने मंगळ ग्रहावर पाठवलेल्या हेलिकॉप्टरचा आवाज कैद केला आहे. नासाच्या मंगळ मोहिमेपैकी ही सर्वात यशस्वी मोहीम मानली जात आहे. पर्सिव्हरेन्स रोव्हर (Perseverance Rover) पासून वेगळे झाल्यानंतर जेझेरो क्रेटर (Jezero Crater) च्या  राईट ब्रदर्स फील्ड्स (Wright Brothers Fields) मध्ये उड्डाण चाचणी करणाऱ्या हेलिकॉप्टरने दक्षिणेकडे 129 मीटर दूर उड्डाण केले. या उड्डाणावेळच्या रोटर ब्लेडचा आवाजही ऐकायला आला आहे. (Capture the sound of a helicopter sent to Mars by NASA: Watch the video) 

AMERICA: टाईम्स स्क्वेअरमध्ये चार वर्षाच्या मुलीसह तिघांवर गोळीबार

डासांच्या भिरभिरणाऱ्या आवाजाप्रमाणे या हेलिकॉप्टरचा आवाज असल्याचे नासाने सांगितले आहे. याबाबत नासाने आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरून याबाबत माहिती दिली आहे. शुक्रवारी नासाने त्याच्या 6 चाकी रोबोटचे फुटेज प्रसिद्ध केले आहेत. यावेळी फुटेजसह नासाने ऑडिओ ट्रॅकही शेअर केला आहे. याशिवाय नासाने सुमारे तीन मिनिटांचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये हेलिकॉप्टरचा आवाज स्पष्ट ऐकता  येऊ शकतो. 

नासाने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “मंगळाकडून आलेला नवा आवाज: आमच्या म्हणजे नासाच्या पर्सिव्हरेन्स रोव्हरने आमच्या इंजीन्यूटी मार्स हेलीकॉप्टरचा आवाज कैद केला आहे. दुसर्‍या ग्रहावर एका अंतराळयानानं  दुसऱ्या अंतराळ यानाचा आवाज रेकॉर्ड करण्याची ही पहिलीच वेळ आहे. व्हिडिओ इंजीन्यूटी हेलिकॉप्टरचा उडताना आणि त्याच्या पंखांचा आवाज देखील ऐकू येत आहे.  हेलिकॉप्टरचे हे पंख सुमारे 2,400 rpm या वेगाने फिरत आहेत. तसेच या आवाजाची उंची फूटांवर आहे.

हेलिकॉप्टरने एअरफिल्डवर गेल्यानंतर 10 मीटरची उंची घेतली. याच्शिवाय लँड होण्यापूर्वी  हेलिकॉप्टरने हाय रिझोल्यूशन फोटोदेखील आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहेत. हे हेलिप्टर मंगळ ग्रहाची पाहणी करून पाहणी करेल. दरम्यान, रोव्हरमध्ये सुपरकॅम नावाचे डिव्हाईस आणि हाय सेन्सर  लावण्यात आले आहेत. हे सुपरकॅम आणि सेन्सर रोव्हरसमोर आलेल्या दगडांचा आणि इतर गोष्टींचा अभ्यास करतात.  मंगळ ग्रहावर पाणी आहे का किंवा असल्यास त्यात कोणती कोणकोणती रसायन आहेत याची माहिती देती. 

त्याचबरोबर, मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावरील  दगड आणि इतर वस्तूंबाबत माहिती मिळवण्यासाठी सुपरकॅममध्ये उच्च क्षमतेचा मायक्रोफोनहि असल्याचे नासा च्या मंगल मोहिमेतील संशोधकांनी सांगितले आहे. 

 

संबंधित बातम्या