Somalia Bombings: सोमालियामध्ये भीषण बॉम्बस्फोट; 100 ठार, 300 जखमी

अल-शबाब या दहशतवादी संघटनेवर सोमालिया सरकारने हल्ल्याची शंका
Somalia Bombings
Somalia BombingsDainik Gomantak

Somalia Bombings: सोमालियाची राजधानी मोगादिशू (Mogadishu) येथे शनिवारी भीषण कार बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटात 100 हून अधिक लोक ठार झाले असून शेकडो जण जखमी झाले आहेत. राजधानीतील्या अत्यंत गजबजलेल्या भागात हा बॉम्बस्फोट झाला. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. या हल्ल्यात लहान मुले, वृद्ध आणि तरुणांनी देखील आपला जीव गमावला आहे.

Somalia Bombings
Somalia BombingsDainik Gomantak

बॉम्बस्फोट हल्ला इतका प्राणघातक होता की परिसरातील अनेक घरांच्या आणि दुकानांच्या खिडक्या आणि दरवाजे तुटले, काचा फुटल्या. शेजारी उभ्या असलेल्या अनेक वाहनांचेही नुकसान झाले. अनेकांचे मृतदेह दूरवर फेकले गेले. हल्ल्यातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील अनेकांची प्रकृती गंभीर असून, मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो.

Somalia Bombings
National Unity Day Run: गोव्यात रन फॉर युनिटीला उदंड प्रतिसाद

अल-कायदाशी संलग्न अल-शबाब या दहशतवादी संघटनेवर सोमालिया सरकारने हल्ल्याची शंका व्यक्त केली आहे. सोमालियाचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान आणि इतर वरिष्ठ अधिकारी अल-शबाबसह दहशतवादी गटांचा सामना करण्यासाठी विस्तारित प्रयत्नांवर चर्चा करण्यासाठी बैठक घेत होते. याचवेळी मोगादिशूमध्ये बॉम्बस्फोट हल्ला झाला आहे. पहिला स्फोट शिक्षण मंत्रालयाच्या बाहेर झाला, तर दुसरा स्फोट एका गजबजलेल्या रेस्टॉरंटच्या परिसरात झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com