यूकेत आढळला मंकीपॉक्सबाधित रुग्ण, संक्रमित व्यक्ती आला नायजेरियातून

यूकेमध्ये (UK) मंकीपॉक्सबाधित रुग्णाची नोंद झाली आहे.
MonkeyPox
MonkeyPoxDainik Gomantak

यूकेमध्ये मंकीपॉक्सबाधित रुग्णाची नोंद झाली आहे. यूकेच्या आरोग्य अधिकार्‍यांनी उंदरांसारख्या संक्रमित प्राण्यापासून मानवांमध्ये मंकीपॉक्स विषाणूचा संसर्ग झाल्याची पुष्टी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, संक्रमित व्यक्ती नुकतीच नायजेरियातून (Nigeria) आली आहे, बहुधा तिथेच त्याला हा संसर्ग झाला असावा. (Cases of the monkeypox virus have been confirmed in the UK)

दरम्यान, ब्रिटनच्या (Britain) हेल्थ प्रोटेक्शन एजन्सीने सांगितले की, मंकीपॉक्स हा एक दुर्मिळ संसर्ग आहे. तो लोकांमध्ये सहज संक्रमित होत नाही. त्याची लक्षणेही किरकोळ असतात. बहुतेक प्रकरणांमध्ये, रुग्ण काही आठवड्यांत बरा होतो. तथापि, काही प्रकरणांमध्ये हा रोग गंभीर असू शकतो.

MonkeyPox
OMG! म्हाताऱ्या उंदराला तरुण बनवण्यात शास्त्रज्ञांना यश, हे तंत्र आले कामी

तसेच, एजन्सीतील क्लिनिकल आणि इमर्जिंग इन्फेक्शन्सचे संचालक डॉ. कॉलिन ब्राउन यांनी शनिवारी सांगितले की, 'पहिल्या पुष्टी झालेल्या प्रकरणांमध्ये संसर्ग झालेल्यांच्या संपर्कात असलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही NHS इंग्लंड आणि NHS रिफॉर्म (NHSEI) सोबत काम करत आहोत.' बाधित व्यक्तीवर सेंट थॉमस हॉस्पिटलमधील विशेष युनिटमध्ये उपचार सुरु आहेत, अशी माहिती डॉक्टर निकोलस प्राइस यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com