12 ते 15 वर्षाच्या मुलांना मिळणार अमेरिकेची फायजर लस

दैनिक गोमंतक
मंगळवार, 11 मे 2021

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर झाला आहे.

भारतात कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेचा कहर झाला आहे. तसेच दुसरीकडे जगगभरात कोरोनाचे रुग्ण कमी होत आहेत. सुरक्षा आणि वेगवान लसीकरण हे यामागचे कारण आहे. 10 मे रोजी अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने (USA) 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांसाठी आणीबाणीच्या वापरासाठी फायझर-बायोएनटेक (Pfizer) लसीला परवानगी मिळाली आहे. एफडीएने नमूद केले की कोरोनाविरूद्धच्या लढाईत हा आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या एफडीएने 12 ते 15 वर्षांच्या वयोगटातील मुलांना आपत्कालीन वापरासाठी फायझर-बायोएनटेक (Pfizer Biontech) लस अधिकृत केली आहे. कोरोना विरोधी लसीचे (Corona Vaccine) भारतात 17 कोटी लोकांना लसीकरण झाले आहे. हे जगातील सर्वात वेगवान लसीकरण असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सांगितले. चीनला हा आकडा गाठायला 119 दिवस लागले, तर अमेरिकेला 115 दिवस लागले. भारताने हे लक्ष्य 114 दिवसांत गाठले आहे असे पुढे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.(Children between the ages of 12 and 15 will receive the US Pfizer vaccine)

सेंट्रल व्हिस्टाचे काम सुरु ठेवण्यावर केंद्र सरकार ठाम; न्यायालयात मांडली बाजू

देशभरात कोरोना कमी होताना दिसत नाहीये. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे 3,66,161 नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह, देशातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढून 2,26,62,575 झाली आहे. त्याचवेळी संसर्गामुळे 3 हजार 754 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यासह, देशातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या, 37,45,237 झाली आहे. त्याचबरोबर, डिस्चार्ज झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 1,86,71,222 आहे. त्याच वेळी, देशातील लसीकरणाची एकूण आकडेवारी 17,01,76,603 एवढी झाली आहे.

जम्मू काश्मीरमध्ये कोरोना रुग्णांच्या सेवेत आता 'तरंगणारी अम्ब्युलन्स'

सलग चार दिवस देशात कोरोनाचे  चार लाखाहून अधिक रुग्ण आढळत आहेत.  भारतात सोमवारी कोरोनाचे एक दिवसात 3,66,161 रुग्ण आढळले आहेत. नव्या रुग्णानापैकी 73.91 टक्के रुग्ण महाराष्ट्र (Maharashtra), कर्नाटक आणि दिल्लीसह 10 राज्यांमधील आहेत. या 10 राज्यांच्या यादीमध्ये केरळ, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल (West bengal), राजस्थान आणि हरियाणा यांचा समावेश आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 48,401 रुग्ण सापडले आहेत. कर्नाटकात 47,930 संक्रमण आणि केरळमध्ये 35,801 रुग्ण आढळले आहेत.

संबंधित बातम्या