चीनचा LAC वरुन सैन्य मागे घेण्यास नकार; भारताची डोकेदुखी पुन्हा वाढणार ?

Hot Springs.jpg
Hot Springs.jpg

भारत आणि चीनमधील ऍक्चुअल लाईन ऑफ कंट्रोलवरून गेल्या वर्षी जूनमध्ये सुरू झालेला वाद अजूनही थांबलेला नसल्याचे पाहायला मिळते आहे. यापूर्वी अनेकवेळा स्वतःच केलेल्या कराराचे उल्लंघन करणाऱ्या चीनने पुन्हा असेच कृत्य केल्याचे दिसून येते आहे. ड्रॅगनने पूर्व लडाखमधील हॉट स्प्रिंग्ज, गोग्रा आणि देप्सांगच्या संघर्ष झोनमध्ये सैन्य मागे हटण्यास नकार दिला असल्याचे समजते आहे.( Chin refuses to withdraw troops from Gogra and Hotsprings)

भारत आणि चीनमध्ये मागील आठवड्यात लष्करी स्तरावर झालेल्या ११व्या फेरीत तब्ब्ल 13 तास चर्चा झाली होती. या चर्चेत चीनने या गोग्रा, हॉट स्प्रिंग्स आणि देप्सांग भागातून आपले सैन्य मागे घेण्यास सहमती दर्शवली होती, मात्र आता चीनने आपले सैन्य मागे घेण्यास नकार समजते आहे. चीनशी झालेल्या वादाचे निराकरण करण्याच्या प्रक्रियेतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार, चीनने यापूर्वी हॉट स्प्रिंग्ज (Hot Springs) आणि गोग्रा (Gogra) पेट्रोलिंग पॉईंट 15 आणि पेट्रोलिंग पॉईंट -17 एमधून सैन्य मागे घेण्यास सहमती दर्शविली होती. मात्र त्यानंतर त्यांनी आपले सैन्य मागे घेण्यास नकार दिला आहे. त्यावरून भारतीय सैन्याने पेट्रोलिंग पॉइंट 15 आणि  पेट्रोलिंग पॉइंट-17ए पर्यंत असलेली चिनी सैन्याची गस्त मान्य करावी अशीच चीनची इच्छा असल्याचे स्पष्ट होते आहे. 

भारतीय सैन्याच्या (Indian Army) उच्च स्तरीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार एप्रिल 2020 मध्ये घडलेल्या घटनांपुर्वी ज्या ठिकाणी चीनचे सैन्य (Chiniese Army) होते, त्याच्या पुढे आता चीनचे तब्बल 60,000 सैनिक असून जो पर्यंत हे चीन हे सैन्य मागे घेत नाही तो पर्यंत सैन्य मागे घेण्याबाबत ठरलेली प्रक्रिया (Disengagement) पूर्ण होणार नाही. सैन्य मागे घेण्याची ही प्रक्रिया एकदा पूर्ण झाल्यानंतर देप्सांग (Depsang) भागातून सैन्य मागे घेण्याबाबतच्या मुद्द्यांकडे लक्ष दिले जाणार आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com