अखेर चिनची कबूली; "गलवान व्हॅलीमध्ये आमचे पाच जवान शहीद झाले"

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021

गेल्या वर्षी पूर्व लडाखच्या गॅलवान व्हॅलीमध्ये भारताच्या सैन्याशी झालेल्या चकमकीत त्याचे पाच लष्करी अधिकारी आणि जवान शहीद झाले होते. चिनी सैन्याच्या स्थानिक माध्यमांद्वारे हि माहिती देण्यात आली.

गलवान व्हॅली संघर्ष: चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) आज शुक्रवारी प्रथमच अधिकृतपणे कबूल केले की गेल्या वर्षी पूर्व लडाखच्या गलवान व्हॅलीमध्ये भारताच्या सैन्याशी झालेल्या चकमकीत त्यांचे पाच लष्करी अधिकारी आणि जवान शहीद झाले होते. अशी माहिती चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सने दिली आहे.

चकमकीत ठार झालेल्या पाच सैनिकांबद्दल चीनने प्रथमच सविस्तर माहिती दिली आहे. चीनच्या केंद्रीय सैन्य आयोगाने (सीएमसी) जून 2020 मध्ये काराकोरम टेकड्यांवर तैनात असलेले आणि भारत सोबतच्या गलवान व्हॅली येथे तैनात असलेले पाच लष्करी अधिकारी आणि जवान भारतीय सिमेवर संघर्ष करतांना शहिद झाले, असे कबूल केले आहे.

स्थानिक माहितीनुसार या चकमकीत मृत्यू झालेल्यांमध्ये पीपल्स लिबरेशन आर्मीचे शिनजियांग मिलिट्री कमांडचे रेजीमेंटल कमांडर क्यूई फबाओ, चेन होंगुन, जियानगॉन्ग, जिओ सियुआन आणि वांग जुओरन अशी या पाच सैनिकांची नावे होती. गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीच्या वेळी भारतातील 20 लष्करी जवान शहीद झाले होते. पैंगोंग लेक च्या उत्तर दक्षिण सिमेवरून दोन्ही देशाने आपले सैन्य मागे घेतले असतांना चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल  टाइम्सने  हि माहिती दिली आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले होते की, चीनबरोबर पांगोंग लेक क्षेत्रात सैन्य मागे हटविण्यासाठी झालेल्या कराराच्या अनुषंगाने दोन्ही बाजू टप्प्याटप्प्याने, समन्वय आणि सत्यापन पद्धतीने तैनाती सैन्य मागे घेणार. राज्यसभेतील निवेदनात संरक्षणमंत्र्यांनीही आश्वासन दिले की या प्रक्रियेदरम्यान भारताने "काहीही गमावले नाही". ते म्हणाले की, पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेत (एलएसी) इतर भागात तैनात आणि देखरेखीसंदर्भात “काही प्रलंबित प्रश्न” आहेत.

संबंधित बातम्या