
मध्य चीनच्या हुनान प्रांतात मोठा अपघात झाला आहे. या अपघातात 10 मिनिटांत तब्बल 49 वाहनांची धडक होऊन 16 जण ठार तर 66 जण जखमी झाले आहेत. रविवारी एका मीडिया रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली.
(16 Killed, 66 Injured in Multi-Vehicle Collision in China's Hunan Province)
शनिवारी संध्याकाळी चांगशा शहरातील शुचांग-ग्वांगझू महामार्गावर हा अपघात झाला. सरकारी न्यूज पोर्टल CGTN ने याबाबत वृत्त दिले असून, 10 मिनिटांत एकूण 49 वाहने धडकली असल्याचे बातमीत म्हटले आहे.
दरम्यान, या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. यात अनेक वाहने एकमेकांना धडकून मोठा अपघात झाल्याचे दिसत आहे. यात अनेक वाहनांचे नुकसान झाले असून, अपघाताच्या ठिकाणी मोठी आग देखील लागल्याचे दिसत आहे. घटनास्थळी बचावकार्य करण्यासाठी अग्निशमन दल आणि पोलिस देखील दाखल झाल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
बातमीत स्थानिक वाहतूक पोलिस विभागाचा हवाला देत अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला असून, 66 जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी आठ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यात म्हटले आहे.
अपघातामुळे यामार्गावरील वाहतूक देखील ठप्प झाली असून, प्रशासनाच्या वतीने वाहन चालकांना सतर्क करण्यात आले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.