China-Bhutan Border: धक्कादायक! भूतानच्या हद्दीद चीनने वसवले गाव

China-Bhutan Border: धक्कादायक! भूतानच्या हद्दीद चीनने वसवले गाव
china-bhutan

ऑस्ट्रेलियन माध्यमांनी (Australian Media) असा दावा केला आहे की चीनने भूतानपासून 8 किमी (China-Bhutan Border) अंतरावर ग्यालाफुग नावाचे गाव स्थापित केले आहे. येथे चीनने रस्ते, इमारती, पोलिस ठाणे आणि सैन्य तळ बांधले आहेत. गावात पॉवर प्लांट, एक कोठार आणि चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचे कार्यालय देखील आहे. ऑस्ट्रेलियन माध्यमांनी एका संशोधन जनरलमध्ये प्रसिद्ध केलेल्या वृत्ताचा हवाला देत हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात म्हटले आहे की चीन व्याप्त ग्यालाफुग गावात 100 हून अधिक लोक आणि समान संख्येत याक आहेत. बांधकाम कामगारांची हालचालही येथे असते. अहवालानुसार हा परिसर भारतातील अरुणाचल प्रदेशाशी (Arunachal Pradesh) जोडलेला आहे आणि चीन अरुणाचलचाही दावा करीत आहे. म्हणूनच भूतान एक निम्मित असून खरा निशाणा भारत आहे असे म्हटले जात आहे.(China-Bhutan Border: Village established by China in Bhutan Province)

दोन्ही देशांमध्ये 470 किमी लांबीची सीमा
ऑस्ट्रेलियन माध्यमांच्या अहवालानुसार चीनला समजले आहे की 140 कोटी लोकसंख्या असलेल्या चीनचा तिबेट विरोध करू शकत नाही. चिनी सैनिकांनी येथे मोठे बॅनर लटकवले आहे. त्यावर 'शी जिनपिंगवर विश्वास ठेवा' असे लिहिले आहे. सीमेवरील वादाबाबत दोन्ही देशांमध्ये कुणमिंग शहरात 25 बैठका पार पडल्या आहेत. दोन्ही देशांमध्ये 470 किमी लांबीची सीमा आहे. तसेच, सीमा सामायिकरणाबाबत भूतान आणि चीनचे वेगवेगळे युक्तिवाद आहेत.

1980 मध्ये चीनच्या नकाशावर भूतानमध्ये गाव
या जमिनीवर कब्जा करून चीन 1998 च्या कराराचे उल्लंघन करीत आहे. चीनच्या या भूभागावर कब्जा केल्याने भूतानमधील लोकांमध्ये निराशा वाढत आहे. अहवालानुसार, 1980 मध्ये चीनच्या नकाशाने ग्यालाफुग भूतानमध्ये दाखविला होता. चीन ज्या भूमीवर आपला दावा सांगत आहे, त्यांच्यासाठी ती नवीन आहे, असा भूतानचा असा विश्वास आहे. चीनने यापूर्वी या भूमीवर कधीही दावा केला नव्हता.

भूतानच्या 12 टक्के भूमीवर चीनचा दावा
चिनी कामकाज तज्ज्ञ रॉबर्ट बर्नेट म्हणाले की, चीन एका विशिष्ट रणनीतीनुसार हे सर्व करत आहे. त्यांना हवे आहे की या उपक्रमांमुळे भूतानने चीनला विरोध करण्यास सुरुवात करावी आणि व्यापलेल्या भूमीवर आपला दावा करावा. रॉबर्ट बर्नेट म्हणतात की बौद्ध लोकसंख्या असलेल्या भूतान आणि चीन व्याप्त तिबेटमध्ये बर्‍याच गोष्टी सामान्य आहेत. चीनपेक्षा भूतानचे भारताशी चांगले संबंध आहेत. भूतानही भारताबरोबर बहुतेक व्यापार करतो. याउलट भूतानमध्ये चीनचे दूतावास नाही. चीनने भूतानच्या एकूण क्षेत्राच्या 12 टक्के क्षेत्राचा दावा केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढत्या सामर्थ्याने चीनची दादागिरीही वाढत आहे. त्याचप्रमाणे दक्षिण चीन समुद्रावरही चीनने बरेच हक्क सांगण्यास सुरवात केली आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com