China Corona Latest News
China Corona Latest NewsDainik Gomantak

China Corona Latest News : चीनमध्ये कोरोनाचा विळखा घट्ट होतोय! सरकारविरोधी निदर्शनांनंतर हजारो रुग्णांची नोंद

China Corona Latest News : चीनमध्ये सतत कोरोनाबाधितांमध्ये वाढ होत असल्याने सरकारची डोकेदुखी वाढली आहे.

China Corona Latest News : चीनमध्ये सतत कोरोनाबाधितांमध्ये वाढ होत असल्याने सरकारची डोकेदुखी वाढली आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने शुक्रवारी सांगितले की, देशात 1 डिसेंबर रोजी 34,980 नवीन कोरोना संसर्गाची प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

ज्यात लक्षणे असलेले 4,278 आणि लक्षणे नसलेले 30,702 आहेत. एका दिवसापूर्वी, चीनमध्ये 36,061 नवीन प्रकरणे नोंदवली गेली, जी विद्यमान आकडेवारीपेक्षा कमी आहेत. दुसरीकडे कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी राबविण्यात आलेल्या झिरो कोविड धोरणाविरोधात तीव्र निदर्शने होत आहेत. (China Corona Latest News)

आंदोलकांनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. अनेक दशकांनंतर सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाविरोधातील हा सर्वात मोठा निषेध आहे. बीजिंग आणि शांघायसह 8 शहरांमध्ये निदर्शने सुरू आहेत, त्यानंतर लोकांची ही उसळलेली लाट शांत करण्यासाठी नियम शिथिल करण्यात आले आहेत, परंतु शून्य-कोविड धोरण अबाधित राहणार आहे. चीन सरकारने शी यांच्यावर करण्यात आलेल्या निषेध किंवा टीकेवर अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही.

शून्य कोविड पॉलिसी म्हणजे काय ?

शून्य कोविड पॉलिसीचा उद्देश प्रत्येक कोरोना बाधित व्यक्तीला वेगळे ठेवणे आहे. या धोरणामुळे अमेरिकेसह इतर प्रमुख देशांच्या तुलनेत चीनमधील कोविड प्रकरणांची संख्या कमी ठेवण्यास मदत झाली आहे, परंतु काही भागात जे लोक चार महिन्यांपासून घरीच आहेत त्यांना योग्य अन्न आणि वैद्यकीय पुरवठा उपलब्ध होत नाही.

त्यामुळे जनता आता रस्त्यावर उतरली आहे. सत्ताधारी पक्षाने गेल्या महिन्यात नियम बदलून व्यत्यय कमी करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु संक्रमण वाढल्यानंतर नियंत्रणे कडक करण्यात आली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com