China Drilling Earth : चीन का खोदतोय 32 हजार फूट खोल खड्डा; जाणून घ्या यामागचा प्लॅन

China Drilling Earth : चीनने शिनजियांग प्रांतातून पृथ्वीवर 32 हजार फूट खोल खड्डा खोदण्यास सुरुवात केली आहे. यास अनेक वर्षे लागू शकतात.
China Drilling Earth
China Drilling EarthDainik Gomantak

गेल्या दोन ते तीन दशकांत चीनने औद्योगिक प्रगतीबरोबर विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातही मोठी प्रगती केली आहे. अशात आत चीनने एक नवा प्रयोग हाती घेत सर्वांना चकित केले आहे.

पृथ्वीवर 50 ते 100 फूट खोदल्यावर पाणी बाहेर येते. कच्चे तेल आणि वायू 1000 फुटांवर  आढळतात. कोळसा आणि इतर धातू कमी खोलीतही आढळतात. असे असतानाही आता चीन पृथ्वीत 32 हजार फूट खोल खड्डा बनवणार आहे. चिनी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, शिनजियांग प्रांतातील तारिम बेसिनमध्ये हे उत्खनन सुरू करण्यात आले आहे. 10 किलोमीटरपेक्षा जास्त खोल असलेल्या या छिद्रातून चीन पृथ्वीशी संबंधित अनेक रहस्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे.

यापूर्वी रशियामध्ये 1970 ते 1992 दरम्यान असेच उत्खनन करण्यात आले होते. या 22 वर्षांत 12,262 फूट खोल खड्डा करण्यात आला. रशियातील हा छिद्र जगातील सर्वात खोल कृत्रिम बिंदू आहे, जो मानवाने बनवला आहे. रशियापाठोपाठ चीनलाही असे छिद्र करून पृथ्वीच्या विकासाचा इतिहास आणि तिची रचना याबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे.

चीनचा उद्देश काय आहे?

या ड्रिलिंग ऑपरेशनमध्ये काम करणारे तांत्रिक तज्ञ वांग चुनशेंग यांनी मीडियाला सांगितले की, '10,000 मीटरपेक्षा जास्त खोल बोअरहोल खोदणे हे एक मोठे पाऊल आहे. यामुळे पृथ्वीच्या अज्ञात पैलूंबद्दल माहिती मिळेल आणि पृथ्वीबद्दलची मानवी समज अधिक व्यापक होईल. यामुळे भूकंप, ज्वालामुखी आणि हवामानातील बदल आणि हजारो वर्षे जुन्या घटना आणि त्यांचा इतिहास अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होईल.

अंतराळ विज्ञानाबरोबरच चीन भूमिगत संशोधनातही वेगाने प्रगती करत आहे. हे उत्खनन 10 महाद्वीपीय स्तरांमधून जाणार असून, त्यामुळे पृथ्वीच्या खंडांचा इतिहास, हवामानातील बदल, जीवसृष्टीची उत्क्रांती आणि पृथ्वीचा इतिहास समजण्यास मदत होणार आहे. तसे, चीनने या उत्खननाबद्दल आणि त्याच्या उद्देशाबद्दल फारशी तपशीलवार माहिती दिलेली नाही.

China Drilling Earth
Squid Game in Singapore : भारतीय व्यक्ती रातोरात लखपती; स्क्विड गेम्समध्ये जिंकले 11.5 लाख रुपये

आव्हाने काय आहेत?

चीन हे उत्खनन आपल्या सर्वात मोठ्या वाळवंटात, तकलीमकन येथे करत आहे. या भागात वाळू आणि धुळीच्या वादळाचा प्रादुर्भाव इतका वाढला आहे की, येथे कोणतेही काम करणे कठीण झाले आहे. आता चीन हे उत्खनन कसे पार पाडतो आणि किती खोलवर उत्खनन करता येईल हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com