सैन्य मगे घेण्यावरुन चीनने पुन्हा बदलली भूमिका

सैन्य मगे घेण्यावरुन चीनने पुन्हा बदलली भूमिका
India china.jpg

पॅंगॉन्ग (Pangong) परिसरातून भारत (India) आणि चीन (china) दोन्ही देशांचे सैन्य (Army) मागे घेण्याची प्रक्रिया यावर्षीच पूर्ण झाली असून आता पूर्व लडाख भागातील गोग्रा आणि हॉट स्प्रिंग्स (Gogra And Hot springs) भागातील सैन्य चीन मागे घेणार होता मात्र आता चीनने पुन्हा आपला खरा चेहरा दाखवण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला चीनने असे स्पष्ट सांगितले होते की, गोग्रा आणि हॉट स्प्रिंग्स परिसरातून आम्ही आपले सैन्य मागे घेऊ, मात्र आता त्यानुसार चीन अमलबजावणी करत नसल्याचे पाहायला मिळते आहे. 

कमांडर स्तरावर होणाऱ्या बैठकीतून या समस्यांचे करण्याचे चीनने या आधी बोलून दाखवले होते. आता पर्यंत भारत आणि चीन दरम्यान 11 वेळा कॉर्प्स कमांडर स्तरीय बैठकी झाल्या आहेत. दोन्ही सैन्यांत आता चर्चेच्या बाराव्या फेरीसाठी हॉटलाईनच्या माध्यमातून तारीख ठरवण्यात येणार होती,मात्र चीन कडून त्याबद्दल कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहायला मिळते आहे. भारताने देखील हे स्पष्ट केले आहे की, चीनने पूर्व लडाख भागातून सैन्य मागे चर्चा करण्यासाठी चर्चा करण्याचा मार्ग मोकळा होईल. मात्र आता चीनने या बैठकी कॉर्प्स कमांडर स्तरावर न घेता स्थानिक कमांडर स्तरावर घेण्यात याव्यात अशी आत ठेवल्याने सैन्यमागे घेण्याच्या आपल्याच भूमिकेवर आता चीन अमलबजावणी करत नसल्याचे दिसते आहे. 

दरम्यान, मे 2020 मध्ये चीनच्या सेनेकडून आक्रमक हालचाली केल्यानंतर दोन्ही देशांमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता. यामुळे चीनची सध्याची भूमिका पाहता गोग्रा हॉट स्प्रिंग्स परिसरातून सैन्य मागे घेण्याची इच्छा नसल्याचे दिसते आहे. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com