भारत-अमेरिकेबरोबरचा तणाव लक्षात घेता चीनच्या संरक्षण बजेटमध्ये वाढ

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मार्च 2021

भारत आणि अमेरिका यांच्यातील तणाव लक्षात घेता चीनने आपले संरक्षण बजेट वाढविले आहे. चीनने सन 2021 साठी संरक्षण अर्थसंकल्पात 6.8 टक्के वाढ केली आहे.

बीजिंग: भारत आणि अमेरिका यांच्यातील तणाव लक्षात घेता चीनने आपले संरक्षण बजेट वाढविले आहे. चीनने सन 2021 साठी संरक्षण अर्थसंकल्पात 6.8 टक्के वाढ केली आहे. चीनने आपले संरक्षण बजेट 209 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवले ​​आहे. चीनचे पंतप्रधान ली किंग यांनी शुक्रवारी देशाच्या नॅशनल पीपल्स कॉंग्रेस (एनपीसी) मध्ये ही घोषणा केली. 

जगात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असताना अशा परिस्थितीत चीनने संरक्षण बजेटमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. संरक्षण बजेटमधील वाढीबाबत एनपीसीचे प्रवक्ते झांग येसूई यांनी येथे पत्रकारांना सांगितले की, चीनचा प्रयत्न राष्ट्रीय संरक्षण मजबूत करण्याचा आहे. कोणत्याही देशाला लक्ष्य करण्याचा किंवा कोणताही धोका उद्भवू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे चीनने सांगितले.

चीनची अर्थव्यवस्था 2020 मध्ये 2.3 टक्के दराने वाढली, गेल्या 45 वर्षातील सर्वात कमी वार्षिक आर्थिक वाढीचा हा दर होता. गेल्या वर्षी कोरोना विषाणूच्या साथीचा परिणाम चीनच्या अर्थव्यवस्थेवर झाला होता, परंतु लवकरच त्यावर त्यांनी मात करण्यात यश मिळवले आहे.

New Zealand: न्यूझीलंडमध्ये सलग तीन भूकंपानंतर टळला त्सुनामीचा धोका 

भारत आणि अमेरिका तणावात वाढ

चीनचे बजेट वाढवण्याबाबत वैज्ञानिकांनी असे म्हटले आहे की, जगावर राज्य करायचे आहे, म्हणूनच संरक्षण अर्थसंकल्पात सातत्याने वाढ होत आहे. अमेरिका आणि भारत यांच्याशी चीनची तणावपूर्ण परिस्थिती आहे. दक्षिण चीन समुद्र आणि हाँगकाँगमध्ये लोकशाही स्थापनेबाबत चीनने अमेरिकेशी वाद सुरूच ठेवले आहेत. याशिवाय पूर्व लडाखवर चीनने भारताबरोबर तणाव कायम ठेवला आहे. चिनी सैन्यातून निवृत्त झालेले वरिष्ठ कर्नल वांग शियांगसुई म्हणतात की अमेरिकेच्या लष्कराला अण्वस्त्रे आणि अवकाशात आपली शक्ती वाढवायची आहे, तर चीनला ती यंत्रणा बिघडवायची आहे. 

चीन 16 मिसाइल सायलो निर्माण करत आहे

चीन आपल्या क्षेपणास्त्र प्रशिक्षण क्षेत्राचा विकास मोठ्या प्रमाणावर करीत आहे. येत्या काही दिवसांत चीन आपली क्षमता वाढवण्यासाठी आणि शत्रूवर वर्चस्व गाजवण्यासाठी क्षेपणास्त्रांना मुख्य शस्त्र बनवत आहे. चीनकडे अशी अनेक प्राणघातक क्षेपणास्त्रे आहेत, जी अमेरिकेकडेही नाही. चीन किमान 16 साइलो निर्माण करीत आहे. 

 

 

 

संबंधित बातम्या