'ड्रॅगन' चा नवा विक्रम, एकाच वेळी 22 उपग्रह प्रक्षेपित केले प्रक्षेपित

चीनने (China) एकाच वेळी दुसऱ्या लाँग मार्च 8 रॉकेटद्वारे (Long March 8 Rocket) चिनी अंतराळ कंपन्यांचे 22 उपग्रह प्रक्षेपित केले आहेत.
Long March 8 Rocket
Long March 8 RocketDainik Gomantak

चीनने (China) एकाच वेळी दुसऱ्या लाँग मार्च 8 रॉकेटद्वारे (Long March 8 Rocket) चिनी अंतराळ कंपन्यांचे 22 उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. लाँग मार्च 8 ला वेनचांग सॅटेलाइट लॉन्च सेंटरमधून (Chinese Space Satellites) रात्री 10:06 वाजता प्रक्षेपित करण्यात आले आहेत. 26 फेब्रुवारीला चायना एरोस्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन (CASC) ने या प्रक्षेपणाची पुष्टी केली आहे. डिसेंबर 2020 मध्ये पहिल्या मोहिमेदरम्यान रॉकेटवर वापरल्या गेलेल्या प्रमाणेच दुसऱ्या लाँग मार्च 8 रॉकेटने साइड बूस्टर पेयरशिवाय उड्डाण केले आहे. या रॉकेटची लांबी 50.3 मीटर आहे. (China Has Launched 22 Satellites Simultaneously)

दरम्यान, पहिल्या टप्प्यासाठी साइड बूस्टरचा वापर करुन 8 मार्चला उभ्या टेकऑफ, वर्टिकल लँडिंगच्या चाचणीसाठी लाँच करण्यात येणार आहे. शनिवारी राबविण्यात आलेली मोहीम हेनान बेटावरुन प्रक्षेपित करण्यात आले. विशेष म्हणजे चीनसाठी (China) ही मोठी गोष्ट असल्याचे मानले जात आहे. कारण पहिल्यांदाच एका रॉकेटच्या सहाय्याने एवढे उपग्रह अवकाशात पाठवून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

Long March 8 Rocket
Russia Ukraine War: 'शांतता' चर्चेसाठी युक्रेन तयार

उपग्रह अवकाशात काय करतील?

अंतराळात पाठवण्यात आलेले उपग्रह वेगवेगळे कार्य करणार आहेत. त्यामध्ये कमर्शियल रिमोट सेन्सिंगद्वारे डेटा गोळा करणे, पर्यावरणाचे निरीक्षण करणे, जंगलातील आग प्रतिबंधक माहिती प्रदान करणे, आणि महत्त्वाचे म्हणजे येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीपूर्वीचा धोका कमी करण्यात मदत होणार आहे. चांगगुआंग उपग्रह टेक्नोलॉजीने 10 नवीन जिलिन-1 उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले आहेत. हे जिलिन-1 GF03D10-18 उपग्रह आहेत, ज्यात GF म्हणजे ‘Gaofen’ किंवा हाई रिजॉल्यूशन. आठ उपग्रहांपैकी प्रत्येकाचे वस्तुमान सुमारे 43 किलोग्राम आहे.

मिनोस्पेसने पाच उपग्रह प्रक्षेपित केले

जिलिन-1 MF02A01 या नव्या प्लॅटफॉर्मची चाचणी घेण्यासाठी 32-किलोचा मल्टि-फंक्शनल उपग्रह आहे. प्रक्षेपित केलेल्या अनेक उपग्रहांना स्पॉनसरशिपद्वारे सेकेंडरी नावे देण्यात आली आहेत. लघु उपग्रह निर्माता मिनोस्पेसने या मोहिमेत सहभागी असलेले पाच उपग्रह तयार केले आहेत. यापैकी दोन Taing-3 (01) 240 kg ऑप्टिकल आणि Taiz-4 (01) 250 kg सिंथेटिक अपर्चर रडार (SAR) उपग्रह आहेत, जे Minospace द्वारे ऑपरेट केले जातील. 2021 मध्ये 55 यशस्वी प्रक्षेपणांसह चीनने राष्ट्रीय स्तरावर एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे, जो 2018 आणि 2020 मध्ये चीनने केलेल्या 39 प्रक्षेपणांचा पूर्वीचा विक्रम ओलांडला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com