दलाई लामा निवडीचा कोणताही अधिकार चीनला नाही

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

पुढील दलाई लामा निवडण्याचा वेदांतानुसार कोणताही आधार चीनकडे नाही. तिबेटी बौद्धांनी गेल्या शेकडो वर्षांपासून आपल्या धार्मिक नेत्याची निवड यशस्वीरित्या केली आहे, असे अमेरिकेचे राजदूत सॅम्युएल डी. ब्राऊनबॅक यांनी स्पष्ट केले आहे.

वॉशिंग्टन :  पुढील दलाई लामा निवडण्याचा वेदांतानुसार कोणताही आधार चीनकडे नाही. तिबेटी बौद्धांनी गेल्या शेकडो वर्षांपासून आपल्या धार्मिक नेत्याची निवड यशस्वीरित्या केली आहे, असे अमेरिकेचे राजदूत सॅम्युएल डी. ब्राऊनबॅक यांनी स्पष्ट केले आहे.

आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यासाठीचे राजदूत हे पद अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या अख्त्यारीत येते. सॅम्युएल यांनी ऑक्टोबरमध्ये भारत दौरा केला होता. त्याविषयी त्यांनी सांगितले की, मी धरमशाला येथे गेलो होतो. हद्दपारीनंतर तेथे स्थायिक झालेल्या तिबेटी समुदायाशी मी संवाद साधला. धार्मिक समुदायांना स्वतःचा नेता निवडण्याचा हक्क असून यात दलाई लामा हे पद सुद्धा आहे. हा अधिकार आता सुद्धा या समुदायाकडे आहे, असे मी त्यांना सांगितले. चीनचा संदर्भ देत ते स्पष्टपणे म्हणाले की, दलाई लामा निवडीचा अधिकार असल्याचा चिनी कम्युनिस्ट पक्षाचा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. आम्ही त्यास विरोध करीत राहू. ब्राऊनबॅक यांनी चीनच्या भूमिकेचे खंडन केले. धार्मिक छळाच्या बाबतीत आजघडीला जगात चीनच्या बाबतची स्थिती सर्वांत वाईट आहे. दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात त्यांना याचा कोणताही फायदा होणार नाही.

अधिक वाचा: 

कोरोनाला येऊन एक वर्ष पूर्ण

 

संबंधित बातम्या