चीनसाठी ज्यो बायडेन अजूनही विजयी नाही..

China has not accepted Joe Biden as Amercian president yet
China has not accepted Joe Biden as Amercian president yet

बीजिंग : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांचा विजय झाल्यावर जगभरातून त्यांचे अभिनंदन होत असताना चीनने मात्र बायडेन यांना विजयी उमेदवार म्हणून स्वीकारण्यास तूर्त नकार दिला आहे. अमेरिकेच्या कायदेशीर प्रक्रियेनुसार निकाल अद्याप जाहीर झालेला नाही, असे कारण चीनने दिले आहे. यामुळे चीन आणि अमेरिका वाद सत्तांतरानंतरही निवळण्याची शक्यता कमी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.   

अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी तीन नोव्हेंबरला झालेल्या निवडणुकीत ज्यो बायडेन आणि कमला हॅरिस विजयी झाल्याचे चार दिवसांच्या मतमोजणीनंतर दिसून आले आहे. विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हार मान्य केलेली नसून काही राज्यांमधील मतमोजणी अद्यापही पूर्ण झालेली नाही. तसेच, बायडेन यांच्या नावाची ‘नियोजित अध्यक्ष’ अशी घोषणाही झालेली नाही. चीनमधील माध्यमांनी या निवडणुकीचे बऱ्यापैकी वार्तांकन केले आणि मतमोजणीनंतर विश्‍लेषणही केले. मात्र, सरकारने अभिनंदन अद्याप केलेले नाही. याबाबत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वँग वेनबिन यांना विचारले असता त्यांनी, ‘बायडेन यांना माध्यमांनी विजयी घोषित केल्याची आम्ही नोंद घेतली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com