China Preparing Attack On Taiwan: चीनची 17 लढाऊ विमाने, 3 युद्धनौका तैवानच्या सीमेवर

चीनी ड्रोनची तैवानवर टेहळणी; युक्रेनप्रमाणे कधी ना कधी हल्ला होणार
China Preparing Attack On Taiwan:
China Preparing Attack On Taiwan:Dainik Gomantak

China Preparing Attack On Taiwan: रशिया-युक्रेन युद्धानंतर आता जगावर आणखी एक संकट घोंघावत असून ज्याप्रमाणे रशियाने युक्रेनवर हल्ला केला तशाच पद्धतीने आज ना उद्या चीनही तैवानवर हल्ला करेल, अशी शक्यता आता दाट होत चालली आहे. कारण चीनची 17 लढाऊ विमाने आणि 3 युद्धनौका तैवानच्या समुद्रात दिसून आल्या आहेत.

China Preparing Attack On Taiwan:
Plane-Truck Crash Viral Video: रनवेवर ट्रकला विमानाची भीषण धडक; पाहा पेरूतील थराराचा व्हिडिओ

चीनचे एक टेहळणी करणारे ड्रोनही तैवानच्या हद्दीत दिसून आले आहे. या हालचालींमुळे तणाव निर्माण झाला असून तैवानसह अमेरिकादेखील अलर्टवर आहे.

चीन सातत्याने तैवानच्या आसपास स्वतःची लढाऊ विमाने आणि युद्धनौका पाठवून तणावात भर टाकत असतो. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने देशाच्या चहुबाजूंना ही चिनी लढाऊ विमाने आणि युद्धनौका ट्रॅक केल्या आहेत. एका टेहळणी ड्रोनला देखील तैवानी यंत्रणेने ट्रॅक केले आहे. शुक्रवार आणि शनिवारी चीनच्या लढाऊ विमानांनी तैवानच्या हवाई हद्दीत घुसखोरीही केली. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या एअरफोर्सच्या विमानांपैकी तीन विमाने ही J-10 फायटर विमाने होती.

चीनी विमानांची घुसखोरी रोखण्यासाठी तैवाननेही स्वतःच्या विमानांची गस्त वाढवली आहे. रेडियोवर इशारा देण्यासह एअरफोर्स संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली तैनात केली आहे. दरम्यान, या महिन्यात चीनचे एकूण 356 विमाने आत्तापर्यंत तैवानच्या हद्दीत ट्रॅक केली गेली आहेत. तर तैवान हद्दीजवळ दिसलेल्या चीनी युद्धनौकांची संख्या 59 झाली आहे.

China Preparing Attack On Taiwan:
FIFA World Cup 2022: युद्ध रशिया-युक्रेनचे; ताप पोलंडच्या फुटबॉल टीमला

तैवान-ब्रिटन व्यापार करारामुळे चीन नाराज

तैवान आणि ब्रिटनमध्ये झालेल्या व्यापार करारामुळे चीन नाराज झाला आहे. चीन तैवानला स्वतंत्र मानत नाही. त्यामुळे तैवानशी स्वतंत्रपणे कुणीही संबंध ठेऊ नयेत, असे चीनचे मत आहे. तथापि, तैवानने मात्र सातत्याने स्वतःच्या स्वातंत्र्याचा आणि सार्वभौमत्वाचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळेही चीन तैवानवर चिडून आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com