ड्रॅगनची कपटनीती! चुंबी खोऱ्यात कनेक्टिव्हिटी करतोय मजबूत

चीन (China) विस्तारवादी नितीचा अवलंब करत शेजारील देशांना आपल्या अधिपत्याखाली आणण्याचा प्रयत्न करत आहे.
Chumbi Valley
Chumbi ValleyDainik Gomantak

चीन (China) विस्तारवादी नितीचा अवलंब करत शेजारील देशांना आपल्या अधिपत्याखाली आणण्याचा प्रयत्न करत आहे. यातच आता चीनने तिबेट स्वायत्त प्रदेशाच्या (TAR) चुंबी खोऱ्यात कनेक्टिव्हिटी वाढविण्यास सुरुवात केली आहे. हे भारतासाठी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या सिलीगुडी कॉरिडॉरच्या अगदी जवळ आहे. चीन या सीमाभागात विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहे. 'द हिंदू'च्या वृत्तानुसार, पूर्व कमांडर लेफ्टनंट जनरल मनोज पांडे (General Manoj Pandey) यांनी सिलीगुडीला "संवेदनशील" म्हटले आहे.

सिलीगुडी कॉरिडॉरला (Siliguri Corridor) लागून असलेल्या चुंबी खोऱ्यात जाण्यासाठी चीन पर्यायी प्रवेश तयार करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीन भूतानच्या प्रदेशामध्ये रस्ते बांधणीचे काम करत आहे, जेणेकरुन त्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. या सीमाभागात चीनकडून रस्त्यांचे जाळे निर्माण झाले तर सिलीगुडी कॉरिडॉरवरही ताण पडेल.

Chumbi Valley
चीनची अमेरिकेत घुसखोरी! अमेरिकन ट्रेड सीक्रेट चोरल्याप्रकरणी चिनी गुप्तहेर दोषी

पेंटागॉनच्या अहवालात हा दावा करण्यात आला

पेंटागॉनने चीनच्या लष्करी आधुनिकीकरणावरील एका प्रमुख अहवालात म्हटले आहे की, चीन भारतासोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) आपला दाबव निर्माण करण्यासाठी "सतत धोरणात्मक कारवाई" करत आहे. भारताचे अमेरिकेसोबत असणारे संबंध दृढ करण्यापासून रोखण्याचा अयशस्वी प्रयत्न चीनकडून केला जात आहे.

अमेरिकेने वाढत्या आव्हानासंबंधी सांगितले

पेंटागॉनचा अहवाल तैवानवरुन अमेरिका आणि चीन यांच्यात निर्माण झालेल्या तणावादरम्यान आला आहे. संयुक्त चीफ ऑफ स्टाफचे अध्यक्ष, यूएस जनरल मार्क मिली यांनी चीनच्या लष्करी प्रगतीबद्दल कठोर इशारा दिल्यानंतर काही तासांनंतर अहवाल प्रकाशित झाला. पेंटागॉनने चीनचे वर्णन अमेरिकेसाठी “वाढणारे आव्हान” असे केले आहे.

तोरसा नदीकाठी रस्ते

गेल्या वर्षी समोर आलेल्या हाई रिजॉल्यूशन सैटेलाइट इमेजमध्ये चीनने भूतानच्या भूभागातून तोरसा नदीच्या बाजूने रस्ते तयार केले होते. दरम्यान आणखी एका संरक्षण अधिकार्‍याने सांगितले की, भूतान आणि चीन यांच्यात अलीकडीच झालेले सामंजस्य करार (एमओयू) तीन-टप्प्यांवरील रोड मॅपवर सीमा सेटलमेंटसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मात्र यामागेही चीनचा काही तरी स्वार्थी हेतू असू शकतो.

Chumbi Valley
चीनची तैवानमध्ये सर्वात मोठी घुसखोरी; 38 लढाऊ विमाने संरक्षण क्षेत्रात उतरली

सिलीगुडी कॉरिडॉर महत्त्वाचा का आहे?

पश्चिम बंगालमध्ये स्थित सिलीगुडी कॉरिडॉर हा बांगलादेश, भूतान आणि नेपाळच्या सीमेला लागून असलेला भूभाग आहे. हे एका ठिकाणी 170X60 किमी आणि सर्वात कमी अंतरावर सुमारे 20-22 किमी आहे. लेफ्टनंट जनरल पांडे यांनी अलीकडेच सांगितले की, सिलीगुडी कॉरिडॉरचे भौगोलिक-सामरिक महत्त्व आहे. हा एक अरुंद जमिनीचा तुकडा आहे, जो ईशान्येला देशाच्या इतर भागाशी जोडतो. यात प्रमुख राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे मार्ग, पाइपलाइन, ऑफ-शोअर केबल (OFC) कनेक्टिव्हिटी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com