भारताविरुद्ध चीन-पाकचा जैविक युद्धाचा कट

PTI
शनिवार, 25 जुलै 2020

तीन वर्षांसाठी गुप्त करार; अमेरिका देखील ‘रडार’वर

बीजिंग

चीन आणि पाकिस्तान एकत्र येऊन भारत आणि अन्य पाश्‍चिमात्य देशाविरुद्ध बायोलॉजिकल वॉरफेअर म्हणजेच जैविक युद्धाचा कट आखत असल्याची धक्कादायक बाब एका अहवालातून उघडकीस आली आहे. यासाठी उभय देशांत तीन वर्षांसाठी गुप्त करार झाला आहे. ॲंथ्रेक्ससारख्या धोकादायक जैविक अस्राचा वापर करण्याबाबत विचार केला जात असल्याचे अहवालात म्हटले आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच कोरोना संसर्ग चीनच्या प्रयोगशाळेतून पसरला असून त्याचे पुरावे असल्याचे म्हटले होते. या आधारावर जैविक अस्त्राच्या शक्यतेला बळ मिळत असल्याचे सूत्राचे म्हणणे आहे. क्लाजोम नावाच्या यूनिटने सूत्राने दिलेल्या माहितीच्या आधारे जैविक अस्त्राबाबत दावा केला आहे. सुरक्षा तज्ञ ॲन्थोनी क्लान यांनी याबाबत लेख लिहला असून तो वृत्तसंस्थांनी प्रकाशित केला आहे.

अहवालात काय
अहवालानुसार वुहानच्या ज्या प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग पसरल्याचा दावा अमेरिका करत आहे, त्याच प्रयोगशाळेत पाकिस्तानला हाताशी धरून जैविक युद्धाचा कट रचला जात आहे. भारताबरोबरच अन्य देश जसे की अमेरिकासारखे देशांना लक्ष्य ठेऊनच कट आखला जात आहे. या देशात संसर्गाचा प्रसार केला जाईल, असा कट आहे. संशोधनावर होणारा खर्च वुहानची प्रयोगशाळा उचलणार आहे.

जैविक अस्त्राचा कट
गुप्तचर संस्थांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, ॲंथ्रेंक्ससारख्या विषाणूचा वापर शस्त्र म्हणून करण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यासाठी पाकिस्तान आणि चीनने तीन वर्षासाठी गुप्त करार केला आहे. याप्रमाणे जैविक शस्त्रे तयार केली जातील. यासाठी मातीशी निगडीत चाचण्या (सॉइल सॅम्पलिंग टेस्ट) करण्यात आल्या आहेत. चीनने पाकिस्तानच्या शास्त्रज्ञांना यासंदर्भातील आवश्‍यक ती माहिती आणि अन्य गोष्टी उपलब्ध करुन दिल्या आहेत.

पाकिस्तानच्या खांद्यावर बंदूक
जैविक अस्त्राचा कट तडीस नेण्यासाठी चीनने पाकिस्तानचा वापर केला आहे. विशेष म्हणजे भारत आणि पाश्‍चिमात्य देशांच्या गुप्तचर संस्थांना या कटाची माहिती मिळाली आहे. या कटासाठी चीन आपल्या भूमीचा वापर करु देणार नसून त्या चाचण्या पाकिस्तानमध्ये करण्याचा विचार चीन करत आहे. धोकादायक बाब म्हणजे, पाकिस्तानच्या प्रयोगशाळेतून बाहेर पडणारा संसर्ग रोखण्यासाठी कोणतेही उपाय केलेले नाहीत.

संपादन- अवित बगळे

संबंधित बातम्या