China: नवीन वर्षात आशेचा किरण आमच्यासमोर...

China: चीनचे प्रशासन कोरोणावर आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत. कोरोणामूळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.
Xi Jinping
Xi JinpingDainik Gomantak

China: चीनमध्ये कोरोणाने पून्हा एकदा हाहाकार माजवला आहे. मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहेत. चीनचे प्रशासन कोरोणावर आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत. कोरोणामूळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.

परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की तापासारख्या आजाराची औषधेदेखील संपली आहेत. मृत्यू होणाऱ्या संख्येत वृद्धांचे प्रमाण जास्त आहे. मृत्यूचे प्रमाण इतके वाढले आहे की, स्मशान घाटावर रांगा लागल्या आहेत.

चीनच्या राष्ट्रपतींनी म्हटले आहे की, रोगप्रसार नियंत्रण एका नवीन चरणात प्रवेश करत आहे. प्रत्येकजण आपले काम पुर्णपणे करत आहे आणि आशेचा किरण बरोबर आपल्यासमोर आहे. चीनच्या प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आव्हान केले आहे. चीनने आपल्या 1.4 अरबांच्या लोकसंख्येतील केवळ 7000 पेक्षा जास्त लोक संक्रमित असल्याचे सांगितले आहे. मात्र काही रिपोर्टसनुसार ही संख्या आणि रुग्ण यांच्यामध्ये तफावत आहे.

Xi Jinping
Happy New Year 2023: बुर्ज खलिफावर रंगीत रोषणाई, पाहा व्हिडिओ

दरम्यान, चीनच्या अधिकाऱ्यांनी माहिती देताना म्हटले आहे की, चीन(China) मध्ये बाहेरुन येणाऱ्या लोकांवरचे 8 जानेवारीला क्वारंटाईन समाप्त करणार आहे. मात्र त्याबरोबरच फ्रान्स( France ), अमेरिका ,जपान( Japan ) आणि इतर युरोपीय देशांनी चीनमधून येणाऱ्या नागरिकांना कोरोणा निगेटिव्ह रिपोर्ट असणे बंधनकारक केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com