चीन अमेरिकेत पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी?

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 1 मार्च 2021

दक्षिण चीन समुद्रात चीनी सैनिकांनी अमेरिकन युध्दनौका असतानाच लाइव्ह मिसाइल फायर ड्रिल केलं आहे.

दक्षिण चीन समुद्रात पुन्हा एखदा चीन आणि अमेरिका आमने सामने आले आहेत. दक्षिण चीन समुद्रात चीनी सैनिकांनी अमेरिकन युध्दनौका असतानाच लाइव्ह मिसाइल फायर ड्रिल केलं आहे. चीनने ही क्षेपणास्त्रांची चाचणी शक्तीप्रदर्शनासाठी केली असल्याचं सांगण्य़ात य़ेत आहे. अमिरेकेचे नवनिर्वाचीत अध्यक्ष जो बायडन झाल्यानंतर दक्षिण चीन समुद्रात चीन आणि अमेरिका या दोन महासत्तांमधील संघर्ष पुन्हा एकदा निर्माण होण्याचे संकेत देण्यात येत आहेत. काही काळापूर्वीच अमेरिकेने सर्वात घातक असणारी 'यूएसएस ओहियो' ही पाणबुडी दक्षिण चीन समुद्रात पाठवली होती. तर दुसरीकडे चीनने अचानक युद्धअभ्यास सुरु करण्याचे कारण अमेरिकेच्या विमानांनी चीनच्या मुख्य भूमीजवळ जाण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले जात आहे.

इंग्लंडमध्ये झाला चक्क दुसऱ्या महायुद्धातील बॉम्बचा स्फोट; व्हिडिओ व्हायरल

चीनच्या सरकारी वृत्तवाहिनी सीसीटीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, चीनी सैनिकांनी दक्षिण थिएटर कंमाडने समुद्रात शत्रूवर हल्ला करताना क्षेपणास्त्र कशापध्दतीने वापरावीत या संदर्भातील हा अभ्यास आहे. मात्र चीनने हा युध्द अभ्यास कोणत्या ठिकाणी आयोजीत केला आहे हे मात्र चीनकडून सांगण्यात आले नाही. दक्षिण थिएटर कंमाडकडे दक्षिण चीन समुद्रातील जलसीमांचे संरक्षण करण्याची जबाबदारी आहे. जपान, तैवान, व्हिएतनामला दक्षिण चीन समुद्रात तोंड देण्यासाठी या कंमाडची स्थापना चीन सरकारकडून करण्यात आली आहे. चीन युध्द अभ्यास करत होता त्यावेळी अमेरिकेची विमाने टेहाळणी करत होती.  
 

संबंधित बातम्या