चीनने ऑस्ट्रेलियाबरोबर आर्थिक वाटाघाटी केल्या स्थगित; दोन्ही देशात वाढला तणाव 

दैनिक गोमंतक
गुरुवार, 6 मे 2021

चीनने ऑस्ट्रेलियाबरोबर आर्थिक वाटाघाटी स्थगित केल्या आहेत.

चीनने ऑस्ट्रेलियाबरोबर आर्थिक वाटाघाटी स्थगित केल्या आहेत. अहवालानुसार, चीन-ऑस्ट्रेलिया (China-Austrelia) सामरिक आर्थिक संवाद गुरुवारी अनिश्चित काळासाठी निलंबित करण्यात आले आहे. राज्य आर्थिक नियोजकानूसार यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण होईल. ऑस्ट्रेलियाच्या सरकारने चीनच्या ड्रीम प्रोजेक्टला बेल्ट अँड रोड (Belt And Road) प्रकल्पाला जोरदार झटका दिला होता. राष्ट्रीय हितसंबंध लक्षात घेऊन त्यांनी या योजनेची डील थांबवली आहे. एवढेच नाही तर ऑस्ट्रेलियाने चीनसह, इराण (Iran) आणि सिरियासह नव्याने लागू करण्यात आलेल्या कायद्यांतर्गत चार द्विपक्षीय करार देखील रद्द केले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या या कारवाईनंतर दोन्ही देशांमध्ये आधीच तणाव निर्माण झाला होता. (China suspends economic talks with Australia)

Gates Divorce: समाज कल्याणासाठी देणार संपत्तीचा मोठा हिस्सा

ऑस्ट्रेलियन परराष्ट्रमंत्री मारिज पायणे यांनी सांगितले होते केंद्र सरकारने नवीन परदेशी व्हिटो कायद्यांतर्गत बीआरआय (BRI) करार संपविला आहे. हा कायदा 2018 मध्ये लागू करण्यात आला होता. त्यावेळी चीनने या कायद्याला विरोध केला होता. हा कायदा चीनवर दुर्भावानेमुळे आणला गेला असे विदेश मंत्र्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि कोरोना विषाणूच्या उत्पत्तीविषयी स्वतंत्र आंतरराष्ट्रीय तपासणीची मागणी केली होती. तेव्हापासून गेल्या वर्षी एप्रिलपासून चीन आणि ऑस्ट्रेलियामधील संबंध बिघडू लागले. नंतर चीनने ऑस्ट्रेलियाकडून अनेक उत्पादनांच्या निर्यातीवर बंदी घातली. तेव्हापासून आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये 'व्यापार युद्ध' सुरू आहे.  

 उइगर मुस्लिमांवरील अत्याचाराविरूद्ध न्यूझीलंडच्या संसदेत प्रस्ताव मंजूर

कोरोनाच्या उत्पत्तीपासून अनेक देशांनी चीन सोबत व्यापार करणे बंद केला आहे. चीनच्या प्रयोगशाळेत कोरोनाचा जन्म झाला असा अनेक देशांचा समज झाला होता परंतू जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानूसार चीनच्या प्रयोगशाळेत कोरोनाचा जन्म झाला नाही असा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने दिला होता. अनेक मोठे देश अजूनही चीन सोबत व्यापार करायला तयार नाहीयेत. अशातच चीनने ऑस्ट्रेलिया सोबत आर्थिक वाटाघाटी बंद केल्या आहेत.   

संबंधित बातम्या