WHO कडून चीनच्या लसीला आपत्कालिन वापरासाठी मंजूरी

दैनिक गोमंतक
शनिवार, 8 मे 2021

जागतिक आरोग्य संघटनेकडून चीनच्या औषध निर्मिती कंपनी असलेल्या सिनोफार्माच्या लसीला आपत्कालिन वापरासाठी मान्यता दिली आहे.

जगभरात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाटही आली आहे. भारतात वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे अनेक राज्यांमध्ये कडक निर्बंध लावण्यात आले तसेच काही राज्यांनी लॉकडाऊन (Lockdown) लावण्याचा पर्याय निवडला आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे  पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.

यातच आता जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) चीनच्या (China) औषध निर्मिती कंपनी असलेल्या सिनोफार्माच्या (Sinopharm) लसीला आपत्कालिन वापरासाठी मान्यता दिली आहे. शुक्रवारी या लसीला मान्यता देण्यात आली आहे. WHO कडून आता ही लस जगभरातील गरजू देशांपर्यंत संयुक्त राष्ट्राच्या कोव्हॅक्स प्रोग्रॅम अंतर्गत पोहोचवण्यात येणार आहे. त्यामुळे आता जगाला कोरोना (कोरोनाव्हायरस) महामारीविरुध्द लढण्यासठी आणखी एका कोरोना लस मिळाली आहे. (China vaccine approved by WHO for emergency use)

फायझर लसीचा शूक्राणूंवर कोणताही परिणाम नाही!

जागतिक आरोग्य संघटनेच्या टेक्निकल अडव्हायजरी ग्रुपच्या निर्णयानंतर चीनच्या सिनेफार्मा लसीला मान्यता देण्यात आली आहे. येत्या काही दिवसांमध्ये जगभरातील गरजू देशांना ही लस उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर युनिसेफ आणि अमेरिकेतील जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रादेशिक कार्यलयामधून सिनोफार्मा लसीचे वितरण केले जाऊ शकते. यापूर्वी WHO कडून शुक्रवारी एक समिती गठीत केली. या समितीकडून चीन निर्मित सिनोफार्माच्या लसीला आपत्कालिन वापरासाठी मान्यता द्यायची का नाही यांसंबंधी विचार करण्यात आला होता. यासंबंधीची माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्यांनी दिली.

अमेरिकेतील संयुक्त राष्ट्राच्या प्रादेशिक कार्यालये आणि मुलांसाठी संयुक्त राष्ट्राची एजन्सी युनिसेफच्या माध्यमातून लसीचे वितरण केले जाऊ शकते. WHO चे प्रवक्ते ख्रिस्तियन लिंडमिअर यांनी म्हटले की, याबातचा निर्णय येत्या शुक्रवारपर्यंत होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर लस किती परिणामकारक आहे याशिवाय सिनोफार्मने त्यांच्या दोन डोसबाबत कमी माहिती दिली आहे.
 

संबंधित बातम्या