चीनची तालिबानी सरकारला करोडोंच्या मदतीची घोषणा

वांग यी यांनी तालिबान सरकारच्या स्थिरतेसाठी (Taliban Government) आपला पाठिंबा जाहीर केला आहे, त्याचबरोबर अफगाणिस्तानच्या सद्य परिस्थितीसाठी अमेरिकेला जबाबदार धरले आहे.
चीनची तालिबानी सरकारला करोडोंच्या मदतीची घोषणा
China will funding big amount to Taliban government says china's Foreign Minister Wang YiDainik Gomantak

पाकिस्तानच्या (Pakistan) नेतृत्वाखाली अफगाणिस्तानच्या (Afghanistan) शेजारील परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत चीनने (China) अफगाणिस्तानच्या नवीन सरकारसाठी मोठे मदत पॅकेज जाहीर केले आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग (Foreign Minister Wang Yi) यी यांनी अफगाणिस्तानला 3 दशलक्ष कोरोना लस (COVID-19 Vaccine) डोस देण्याची घोषणा केली आहे. यासह, 30 दशलक्ष डॉलर किंमतीचे अन्न मदत, हिवाळी साहित्य आणि मोठया प्रमाणात औषधे पाठवण्यात येणार असल्याचे चीनने सांगितले आहे. (China will funding big amount to Taliban government china's Foreign Minister Wang Yi )

तालिबानी सरकारमध्ये चीनचा सहभाग

चीनने तालिबानसाठी आणखी अनेक प्रकारच्या मदतीची घोषणा केली आहे , ज्याचा थेट अर्थ चीनचा मागील दरवाजातून तालिबानच्या सत्तेत सहभाग आहे. वांग यी यांनी तालिबान सरकारच्या स्थिरतेसाठी आपला पाठिंबा जाहीर केला आहे, त्याचबरोबर अफगाणिस्तानच्या सद्य परिस्थितीसाठी अमेरिकेला जबाबदार धरले आहे. चीनने तालिबानला अफगाणिस्तानातून सर्व दहशतवादी संघटना संपवण्याचे आवाहन केले आहे.

China will funding big amount to Taliban government says china's Foreign Minister Wang Yi
तालिबान सरकार स्थापनेनंतर जगभरातून प्रतिक्रिया, चीन समाधानी तर जर्मनी कठोर

या व्यतिरिक्त, चीनने अफगाणिस्तानला अनेक मदत करण्याच्या घोषणा केल्या, जसे बंदर सुविधा मजबूत करणे, विशेष मालगाड्या चालवणे, अफगाणिस्तानला आर्थिक विकासासाठी योजना सहाय्य देणे. दहशतवाद्यांविरोधात प्रभावी पावले उचलता यावीत यासाठी शेजारील देशांना अफगाणिस्तानला त्याचबरोबर गुप्तचर सामायिकरण आणि सीमा सुरक्षेसाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे.

तालिबानने अफगाणिस्तानात आपल्या सरकारची घोषणा केली आहे. मुल्ला मोहम्मद हसन अखुंद यांना नवीन सरकारचे नेते बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर तालिबानचे सह-संस्थापक अब्दुल गनी बरदार यांना उपनेते बनवण्यात आले आहे आणि अमेरिकेने दहशतवादी संघटना म्हणून नियुक्त केलेल्या हक्कानी नेटवर्कच्या संस्थापकाचा मुलगा सिराजुद्दीन हक्कानीला गृहमंत्री बनवले आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com