चीनचा मोठा निर्णय; जगातील सर्वात मोठी एकल-अपर्चर दुर्बिण खगोलशास्त्रज्ञांकरिता खुली 

चीनचा मोठा निर्णय; जगातील सर्वात मोठी एकल-अपर्चर दुर्बिण खगोलशास्त्रज्ञांकरिता खुली 
china.jpg

बीजिंग : चीनने जगातील खगोलशास्त्रज्ञांकरिता एक मोठी भेट दिली आहे.  चीनने खगोलशास्त्रज्ञांन त्यांची जगातील सर्वात मोठी एकल-अपर्चर दुर्बिण वापरण्याची परवानगी  दिली आहे. एकल-अपर्चर दुर्बिण ही जगातील सर्वात संवेदनशील दुर्बिण आहे.  तसेच, ही  500 मीटर अपर्चर स्फेरिकल टेलीस्कोप (फास्ट) पूर्वीच्या रेडिओ दुर्बिणीच्या दुप्पट क्षेत्राचे क्षेत्र व्यापू शकेल आणि त्याचे वजन  3-5 पट अधिक अचूक असल्याचा दावाही चीनने केला आहे.  या दुर्बिणीचे नाव तियानयान असे आहे, ज्याचा अर्थ चिनी भाषेत ''स्वर्गातील नेत्र'' असा होतो. 

चीनची हा विशाल दुर्बिण देशाच्या दक्षिण आणि पश्चिम भागातील गुइझोउ के डाओडांग याठिकाणी आहे. ही दुर्बिण जानेवारी 2020 मध्ये पूर्णपणे कार्यरत झाली. चीनने आता हे जगभरातील खगोलशास्त्रज्ञांसाठी उघडले आहे. ही  दुर्बिण बनविण्यासाठी चीनला पाच वर्षांचा कालावधी लागला होता. या दुर्बिणीने सुरुवातीपासूनच स्थिर आणि विश्वासार्ह सेवा दिल्याचा दावाही चीनने केला आहे. 

या रेडिओ दुर्बिणीने आतापर्यंत 300 शेपटीच्या तारकां शोधल्या आहेत. तसेच बर्‍याच क्षेत्रात यश मिळवले आहे. जगभरातील खगोलशास्त्रज्ञ या दुर्बिणीच्या वापरासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात, असे चीनने म्हटले आहे. ऑगस्टपासून परदेशी खगोलशास्त्रज्ञांना या दुर्बिणीचा वापर करण्याची परवानगी चीनने दिली आहे. बीजिंग नॉर्मल युनिव्हर्सिटीचे खगोलशास्त्रज्ञ झांग टोंगजी हे या प्रकल्पाचे मुख्य वैज्ञानिक आहेत. या दुर्बिणीद्वारे  दुसऱ्या जगातही जीवसृष्टी असल्याचे अनेक संकेत मिळाल्याचे झांग टोंगजी यांनी सांगितले आहे. 

16 हजार फूट दुर्बिणी 1994 मध्ये प्रस्तावित तहवण्यात आला होता, ज्याला अखेर 2007 मध्ये मंजूरी मिळाली.   36 फुटच्या या डीशमध्ये 4,500 त्रिकोणी पॅनेल्स आहेत. येथे 33-टन रेटिना देखील आहे जी 460-525 फूट उंचीवर टांगली आहे. याची किंमत 26.9 कोटी आहे. रेडिओच्या सिग्नलमध्ये कोणताही इंटरफेअरन्स  न होण्यासाठी  याठिकाणी आसपासच्या तीन मैलाचा परिसर पूर्णपणे रिकामा करण्यात आला आहे.   परग्रहवारील जीवांचा शोध घेण्याव्यतिरिक्त, दुर्बिण पल्सर, ब्लॅक होल, गॅस ढग आणि आकाशगंगे यासारख्या इतर वैश्विक परिमाणांचा अभ्यास करेल, असेही चीनच्या वतीने सांगण्यात आले आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com