China: सुट्टीच्या कालावधीत दरदिवशी 36000 कोरोणारुग्णांचा मृत्यू होण्याचा अंदाज

China:चीनने कोरोणा संबंधित नियम शिथिल केल्यावर कोरोणा रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले होते. आता कोरोणा रुग्णांच्या संख्येबाबत नवीन माहीती समोर आली आहे.
China Corona Latest News
China Corona Latest NewsDainik Gomantak

China: चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोणाने पुन्हा थैमान घातले आहे. चीनने कोरोणा संबंधित नियम शिथिल केल्यावर कोरोणा रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले होते. आता कोरोणा रुग्णांच्या संख्येबाबत नवीन माहीती समोर आली आहे.

चीनमध्ये लुनार नवीन वर्षांच्या असलेल्या सुट्ट्यांमध्ये रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढ होण्याची शक्यता आहे. दरदिवशी 36000 कोरोणा रुग्णांचा मृत्यू होण्याची शक्यता असल्याचे जगभरातील विविध हेल्थ रिसर्च कंपन्यांनी म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,हा महामारीच्या काळात आत्तापर्यत अनुभवलेला सगळ्यात वाईट काळ असणार आहे. संपुर्ण जगामध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्यू पाहायला मिळेल असे देखील संशोधनाच्या अहवालामध्ये म्हटले आहे.

29 डिसेंबरपर्यत 29000 कोरोणा रुग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाण पाहायला मिळत होते.आता या प्रमाणात अचानक वाढ होण्याचे कारण आणि रुग्णांच्या मृत्यूंच्या आकड्याबाबत चीन प्रशासन अधिकृत माहिती पुरवत नाही. त्यामुळे लोकसंख्येच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या चीनमध्ये कोरोणाचा प्रसार इतक्या वेगाने कसा होत आहे याचे कोणतेही स्पष्ट कारण समजू शकले नाही असे लंडन( London )स्थित रिसर्च कंपनीने म्हटले आहे. कोव्हीड-१९ ची सुरुवात झाल्यापासून पहिल्यांदाच चीनमधला सर्वात महत्वाचा सण लुनार नवीन वर्ष साजरे केले जाणार आहे.

लाखो लोक यावेळी वेगवेगळ्या देशातून आपल्या घरी परततील मात्र यावेळी कोरोणाचे मोठ्या प्रमाणावर संक्रमण होण्याची शक्यता आहे, असे हेल्थ अॅनॅलॅटीक्स कंपनीने म्हटले आहे.आमच्या अंदाजानुसार चीनच्या आरोग्य क्षेत्रावर लक्षणीय भार पडेल. ज्या रुग्णांचे उपचार चालू आहेत त्यांचा दवाखान्यातल्या वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे मृत्यू होण्याचा धोखा असल्याचे एअरफिनिटीचे डायरेक्टर मॅट लिनली यांनी म्हटले आहे.

China Corona Latest News
... तर तेव्हा भारताची 8 विमाने पाडली असती, पाकिस्तानचे माजी हवाईदल प्रमुख बरळले

सुट्टीच्या कालावधीत या वर्षी रुग्णसंख्या 2.1 अब्ज होईल. ही संख्या गेल्या वर्षीच्या दुप्पट होईल परंतु तरीही २०१९ च्या 70टक्के असेल असा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. दरम्यान, कोरोणाचे संक्रमण रोखम्यासाठी चीन(China)च्या प्रशासनाने आहे त्या ठिकाणाहून लुनार नवीन वर्ष साजरे करण्याचे आवाहन आपल्या नागरिकांना केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com