अफगाणिस्तानमध्ये चीनची एंट्री ? China  करणार तालिबानला मदत
China President Xi jinpingDainik Gomantak

अफगाणिस्तानमध्ये चीनची एंट्री ? China करणार तालिबानला मदत

चीनकडून (China) सांगण्यात आले की, अफगाणिस्तानच्या पुननिर्माणमध्ये आम्ही तालिबानबरोबर आहोत.

अफगाणिस्तानमधून (Afghanistan) अमेरिकी आणि नाटो सैन्यांनी काढता पाय घेतल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये अस्थिरता निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. तालिबान (Taliban) अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा सक्रीय होत आहे. थेट अफगाणिस्तान सरकारवर निशाणा साधत राजकिय प्राबल्य वाढविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. अफगाणि सेना आणि तालिबान यांच्यात युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यातच आता तालिबान प्रतिनिधीमंडळ आणि चीनी विदेश मंत्री यांच्यात बुधवारी बैठक पार पडली. चीनकडून सांगण्यात आले की, अफगाणिस्तानच्या पुननिर्माणमध्ये आम्ही तालिबानबरोबर आहोत.

मात्र त्यासाठी चीनकडून एक अट ठेवण्यात आली आहे की, तालिबानने पूर्वी तुर्किस्तान (Turkey) इस्लामिक संघटनेबरोबर असणारे संबंधाना तिलांजली द्यावी लागणार आहे. चीनच्या शिनजियांग प्रांतामध्ये (Xinjiang Province) इस्लामिक संघटनेच्या हस्तक्षेप वाढत आहे. आणि चीन प्रामुख्याने शिनजियांग प्रांतामध्ये होत असलेल्या हल्ल्यांना जबाबदार मानतो. चीनचे परराष्ट्र मंत्र्यांनी या गोष्टी मुल्ला अब्दुल गनी बरादर (Mulla Abdul Gani Baradar) यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या बैठकीमध्ये सांगितल्या आहेत.

China President Xi jinping
अफगाणिस्तान होणार दुसरे 'सौदी अरेबिया'; देशात खनिजांचा प्रचंड साठा

दरम्यान, तालिबान आणि चीनचे परराष्ट्र मंत्री यांच्यात पार पडलेली बैठक चीनमधील तियानजिन शहरामध्ये पार पडली आहे. मुल्ला अब्दुल गनी बरादर हे अमेरिकाबरोबर पार पडलेल्या शांती वार्तालापामध्ये मुख्य वार्ताकार असण्याबरोबर ते तालिबान संघटनेच्या राजनैतिक कार्यालयाचे ते प्रमुखही आहेत. पाकिस्तानी सेनेवर अफगाणिस्तान सेनेचे अधिकारी आगोदरपासूनच तालिबानला सहकार्य करत असल्याचा आरोप करत आहेत. आता चीन आणि तालिबान यांच्यात पार पडलेल्या बैठकिवरुन निश्चित करण्यात येत आहे की, चीनही अफगाणिस्तानमध्ये चंचूप्रवेश करु शकतो. तर काही प्रसारमध्यमांच्या रिपोर्टनुसार, अफगाणिस्तानमध्ये चीनने प्रवेश कधीच केला आहे.

China President Xi jinping
अफगाणिस्तान विद्यार्थ्याला मारहाण  

वखानमध्ये चीनी टॅंक

आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यमांच्या रिपोर्टनुसार, अफगाणिस्तानमधील वखान कॉरिडोरमध्ये चीनच्या रेड आर्मीची वाहने दिसली आहेत. हे पहिल्यांदाच दिसत आहे की, चीनी आर्मी अफगाणिस्तानमध्ये पेट्रोलिंग करताना दिसत आहे. तर दुसरीकडे चीनचे म्हणणे आहे की, पाकिस्तानच्या मदतीने आम्ही अफगाणिस्तानमधील आतंकवाद्यांच्या पूर्णपणे नायनाट करण्याच्या प्रयत्नात आहोत त्यासाठी आम्ही संयुक्त अभियानाची सुरुवात देखील केली आहे. सध्या औपचारिकरित्या सांगण्यात आले नाही की, चीन अफगाणिस्तानमध्ये प्रवेश केला आहे ते मात्र लवकरच यासंबंधीची खात्री होईल. अफगाणिस्तानमध्ये हिसंचारास प्रवृत्त करत असल्याचा आरोप पाकिस्तानी रेंजर्सवर सातत्याने होत आला आहे.

China President Xi jinping
अफगाणिस्तान विद्यार्थ्यावर चाकूहल्ला केलेला फरारी जॉँटी कोईआ गजाआड

चीन दौऱ्यावर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी चीनी समकक्ष वांग यांच्यासोबत एक बैठक शनिवारी पार पडली. कुरेशी बीजिंग दौऱ्यावर आहेत. बैठक पार पडल्यानंतर प्रेस रिलिज जाहीर करत त्यांनी सांगितले की, दक्षिण आशियामध्ये शांतता राखण्यासंबंधी चर्चा करण्यात आली आहे. यातच चीनी नागरिकांना विशाना बनवत पाकिस्तानमध्ये एक बसमध्ये स्फोट करण्यात आला होता. त्यानंतर चीनला चिंता सतावत आहे की, जर आपल्या सीमेशी सलंग्नित असणाऱ्या अफगाणिस्तानमध्ये आतंकवाद्याचे बस्थान होऊ शकते यासाठी आपण आतंकी हल्ला रोखण्यात अपयशी ठरु शकू. आणि याच कारणामुळे चीन तालिबानबरोबर बैठक करत आहे.

Related Stories

No stories found.