भारतीय सीमेलगत चीनची पहिली 'बुलेट ट्रेन' सुरु

हिमालयातील (Himalayas) तिबेट (Tibet) या भागामध्ये शुक्रवारी चीनने संपूर्णपणे विजेवर चालणारी बुलेट ट्रेन (Bullet train) सुरु केली असून ती तिबेटची राजधानी ल्हासा ते न्यायिंगची यांना जोडणारी आहे.
भारतीय सीमेलगत चीनची पहिली 'बुलेट ट्रेन' सुरु
bullet trainDainik Gomantak

हिमालयातील (Himalayas) तिबेट (Tibet) या भागामध्ये शुक्रवारी चीनने संपूर्णपणे विजेवर चालणारी बुलेट ट्रेन (Bullet train) सुरु केली असून ती तिबेटची राजधानी ल्हासा ते न्यायिंगची यांना जोडणारी आहे. विशेष म्हणजे अरुणाचलप्रदेश (Arunachal Pradesh) लगत असलेल्या एका शहाराजवळून या बुलेट ट्रेनचा मार्ग गेला आहे. ल्हासा ते न्यायिंगची यांना जोडणारा शिचुआन (Sichuan) ते तिबेट रेल्वेमार्ग (Tibet) तयार करण्यात आला असून त्याचे उद्घाटन 1 जुलै रोजी चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या (Chinese Communist Party)शताब्दीनिमित्त होणार आहे. शुक्रवारी तिबेट या स्वायत्त प्रदेशामध्ये बुलेट ट्रेन सुरु झाली असून तिचा ताशी वेग 160 कि. मी.एवढा आहे.

ही बुलेट ट्रेन एकेरी मार्गावरुन धावणार असून ती शन्नान, ल्हासा, न्यायिंगची यासह नऊ स्थानकांवर थांबणार आहे. प्रवासी आणि मालवाहतूक त्यामधून करण्यात येणार असून रस्ता मार्गापेक्षा ल्हासा ते न्यायिंगची अंतर 5 तासावरुन 3.5 तासांवर येणार आहे. न्यायिंगची आणि शन्नान यांच्यातील प्रवासाचा वेळ सहा तासांवरुन दोन तासावर येणार आहे. (China's first 'bullet train' near India launched)

bullet train
"गलवान संघर्षानंतर चीनी सैन्याला समजले की, आपल्याला जास्त प्रशिक्षणाची गरज"

या बुलेट ट्रेनचा मार्ग पाच बोगद्यामधून जातो आणि त्यात 121 पूल वापरले असून ती ब्रम्हपुत्रा वरुन तो 16 वेळा जातो. पुलांची आणि बोगद्यांची लांबी एकूण रेल्वे मार्गाच्या 75 टक्के आहे. बुलेट ट्रेनची मालवाहतूक क्षमता ही 1 कोटी टन असणार आहे. त्यामधून आर्थिक विकासाबरोबरच सीमेलगत राहणाऱ्या लोकांचे जीवनमानही सुधारणार आहे. तिबेट ते शिचुआन ही तिबेटमधील दुसरी रेल्वे असून क्विंघाय आणि तिबेट ही रेल्वे नंतर सुरु होणार आहे. ती अग्नेय भागामधून जाणार आहे. तज्ञांच्या मते, जगामध्ये भूगर्भशास्त्राच्या दृष्टिकोनातून हा भाग संवेदनशील मानला जातो.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com