चीनची दादागिरी; हाँगकाँगमधील ‘अ‍ॅपल’ वृत्तपत्रही बंद

HONCONG 1.jpg
HONCONG 1.jpg

हाँगकाँग : हॉंगकॉंगमधील (Hong Kong) लोकशाहीचे समर्थक असलेल्या ‘अ‍ॅपल’(Apple) या एकमेव वृत्तपत्राची अखेरची आवृत्ती गुरुवारी प्रकाशित होणार आहे. हॉंगकॉंगमधील निमस्वायत्त शहारातील बंडखोरीविरुध्द चीन सरकारने (Government of China) मोहिम उघडली आहे. त्याचाच भाग म्हणून या वृत्तपत्राचे पाच संपादक आणि पदाधिकारी यांना अटक करुन कोटीवधी रपयांची मालमत्ताही जप्त करण्यात आल्याने हे वृत्तपत्र जबरदस्तीने बंद करावे लागत आहे. 

हॉंगकॉंगमधील या भयावह स्थितीमुळे वृत्तपत्राच्या मुद्रीत आणि ऑनलाईन आवृत्त्या बंद कराव्या लागल्या आहेत, असे नेक्स्ट मिडियाची कंपनी (Next Media Company) असलेल्या ‘अ‍ॅपल डेली’ (Apple Daily) च्या संचालक मंडळाने एका निवेदनामध्ये सांगण्यात आले आहे. चीनने लोकशाहीचा समर्थक असलेला आवाज बंद करुन या शहरावर आपले पूर्णपणे नियंत्रण ठेवण्याचा निर्धार केला असल्याचे सूचित होत आहे. 2019 मध्ये हॉंगकॉंग सरकारविरोधी (Government of Hong Kong) निदर्शने करण्यात आली, तेव्हापासून चीनने वृत्तपत्रांच्या कर्मचाऱ्यांना अटक करण्यासाठी कडक  राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचा वापर करण्यास सुरुवात केली. (Chinas grandeur The Apple newspaper in Hong Kong is also closed)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com