चीनची तैवानमध्ये सर्वात मोठी घुसखोरी; 38 लढाऊ विमाने संरक्षण क्षेत्रात उतरली

पहिल्यांदाच 25 लष्करी लढाऊ विमाने तैवानच्या संरक्षण क्षेत्रात चीनने (China) पाठविली आहेत. त्यानंतर संध्याकाळी 13 इतर विमाने पुन्हा चीनने तैवानच्या हद्दीत घुसवली.
चीनची तैवानमध्ये सर्वात मोठी घुसखोरी; 38 लढाऊ विमाने संरक्षण क्षेत्रात उतरली
AircraftDainik Gomantak

तैवान (Taiwan) आणि तिबेट (Tibet) हा आपलाच प्रदेश असल्याचे चीन सातत्याने सांगत आला आहे. यातच आता तैवानमध्ये चीनने (China) आत्तापर्यंतची सर्वात मोठी घुसखोरी केली असल्याचे तैवानने सांगितले आहे. पहिल्यांदाच 25 लष्करी लढाऊ विमाने तैवानच्या संरक्षण क्षेत्रात चीनने पाठविली आहेत. त्यानंतर संध्याकाळी 13 इतर विमाने पुन्हा चीनने तैवानच्या हद्दीत घुसवली. त्यावर तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, यामध्ये अणुबॉम्ब टाकणाऱ्या विमानांचाही समावेश आहे. (China Taiwan Conflict) प्रत्युत्तरादाखल तैवाननेही आपली लढाऊ विमान या प्रदेशाकडे पाठवली असून मिसाइल सिस्टम तैनात केली आहे. वास्तविक चीन तैवानवर दावा करतो, तर तैवान स्वतःला एक स्वतंत्र देश मानतो.

Aircraft
तैवान अध्यक्ष-चेक प्रतिनिधीची भेट

तैवान गेल्या एक वर्षाहून अधिक काळ तक्रार करत आहे की, चीनी विमाने आमच्या हद्दीत घुसखोरी करत आहेत. पंतप्रधान सु त्सेंग-चांग (Su Tseng-chang) यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, "चीन अनावश्यक लष्करी आक्रमकता दाखवत आहे, ज्यामुळे प्रादेशिक शांतता भंग होत आहे." याच दिवशी चीन सरकारने पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाची स्थापना केली असून 72 वर्षे पूर्ण झाल्याच्या आनंदात राष्ट्रीय दिवस साजराही केला आहे.

Aircraft
अमेरिका चीन आमने-सामने: तैवान, कोरोना, तिबेट मुद्द्यावर अधिकाऱ्यांची बैठक

यावर चीन काय म्हणतो?

चीनने या प्रकरणी यापूर्वी म्हटले आहे की, आम्ही आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी हे करत आहे. यासह, चीनने अमेरिका आणि तैवानच्या 'द्विपक्षीय संबंधावरही आक्षेप घेतले आहेत. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, पीपल्स लिबरेशन आर्मीचे 25 (पीएलए) विमाने (Largest Chinese Incursion in Taiwan) एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोन (एडीआयझेड) मध्ये दाखल झाले होते. एडीआयझेड हे देशाच्या हवाई क्षेत्राबाहेरील क्षेत्र आहे. जेथे राष्ट्रीय सुरक्षेसाठी परदेशी विमानांची ओळख, निरीक्षण आणि नियंत्रण केले जाते. हे तांत्रिकदृष्ट्या आंतरराष्ट्रीय हवाई क्षेत्र देखील मानले जाते.

Aircraft
शेवटच्या श्वासापर्यंत चीनशी लढणार: तैवान

पाणबुडीविरोधी विमानेही पाठवली

25 विमाने तैवानच्या दिशेने पाठवल्यानंतर चीनने त्याच परिसरात संध्याकाळी आणखी 13 विमाने पाठवली. त्यांनी तैवान आणि फिलिपिन्सच्या जलक्षेत्रावरुन उड्डाण केले. (Chinese Aircraft in Taiwan). मंत्रालयाने म्हटले आहे की, चीनी विमानांमध्ये चार H-6 बॉम्बर्स समाविष्ट आहेत, जे अण्वस्त्रे वाहून नेऊ शकतात. तसेच एक पाणबुडीविरोधी विमानही आहे. तैवानने केलेल्या टिप्पण्यांवर नाराजी व्यक्त करण्यासाठी बीजिंग अनेकदा अशा कृती करते. परंतु शुक्रवारी केलेल्या या कारवाईने चीनला काय सिद्ध करायचे आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Related Stories

No stories found.