भारतीय सीमेवर चीनचा युध्दसराव; प्रत्येक हालचालीवर करडी नजर

india-china.jpg
india-china.jpg

लडाखच्या (Ladakh) गलवान (Galvan) खोऱ्यात जून 2020 मध्ये चिनी सैन्यासह (Chinese troops) झालेल्या संघर्षानंतर सीमेवर अद्याप शांतता नाही. भारत-चीन या दोन्ही देशांचे सैन्य अजूनही एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. पूर्व लडाख भागात तणाव कमी करण्याचे प्रयत्न सुरु असतानाच चीनकडून पुन्हा एकदा कुरापती सुरु झाल्या आहेत. पूर्व लडाखमधील सीमाभागात चीनने सैन्याच्या कारवाया वाढवल्या आहेत. या सीमाभागात चीनने युध्दसराव(Chinas military exercises) सुरु केला आहे. तरी, भारत (India) चीनच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवून आहे. लडाख सीमेजवळील हवाई कारवायांबरोबरच चीनच्या सुरु असलेल्या युध्द अभ्यासावर लक्ष ठेवून आहे, असे यावेळी भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितले. (Chinas military exercises on the Indian border A gray eye on every movement)

चीनचा लढाऊ विमानांसह युध्दसराव
चीनच्या हवाई दलाने काही दिवसांपूर्वी आपल्या लढाऊ विमानांसह पूर्व लडाखला लागून असलेल्या एलएसीच्या हवाई हद्दीत एक मोठा युध्दाभ्यास केला होता. जवळपास दोन डझन लढाऊ विमानांनी या सरावात भाग घेतला होता, असे सांगण्यात येत आहे. या लढाऊ विमानांमध्ये जे -11(J-11) आणि जे-16 (J16) चा समावेश करण्यात आला होता.

तिबेट (Tibet) आणि झिनजियांग(Xinjiang) प्रांतातील वेगवेगळ्या एअरबेसमध्ये चीनच्या हवाई दलाने युध्दसराव केला होता. यामध्ये गर-गुनसा, होपिंग, लिंझी, डोन्गा-जोंग या ठिकाणांचा समावेश होता. चीनी हवाई दलाने लढाऊ विमानारोबरच या सरावात आपली हवाई-संरक्षण यंत्रणा (Air-defense system) समाविष्ट केली होती. दुसऱ्या देशातील लढाऊ विमानांनी त्याच्या हवाई क्षेत्रात प्रवेश केला तर त्यांना कारवाई करता येईल. 

भारतीय जवानांची करडी नजर
चीनच्या युध्दसरावावर भारत लक्ष ठेवून आहे. भारतीय सैन्य देखील सातत्याने युध्दाभ्यास करत आहे. चिनी लाल सेना त्यांच्या भागामध्ये युध्दसराव करत आहेत. आम्ही आमच्या भागातमध्ये युध्दसराव करत आहोत, असे चीनी अधिकाऱ्याने सांगितले आहे. चीनने आपली रेड आर्मी आणि युध्दसामग्री आणल्याने तिथून सैनिक पुढे येऊ शकतात. त्यामुळे भारतीय आर्मी हाय अलर्टवरक आहे असे भारतीय जनरल प्रमुख नरवणे यांनी यावेळी सांगितले.

लडाख भागातील सीमेवरील परिस्थिती मागील वर्षाभरापून बदलेली नाही. दोन्ही देशांचे 50 ते 60 हजार सैनिक या भागामध्ये तैनात आहेत. पॅंगॉंग सरोवर परिसरात झालेल्या चकमकीनंतर भारताने सैन्य मागे घेतलेले नाहीत. लडाख तिबेट सीमेवरील परिस्थितीदेखील निवळलेली नाही. दोन्ही देशांनी आपली हवाई दले तैनात केली आहेत. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com