China Population: साठ वर्षानंतर पहिल्यांदाच चीनची लोकसंख्या घटली; भारताला होणार फायदा?

लोकसंख्या नियंत्रण उपायांमुळे देशाची लोकसंख्या कमी होत असल्याचा निष्कर्ष काढला जात आहे.
China Population
China PopulationDainik Gomantak

China Population: चीनच्या लोकसंख्येमध्ये 1961 नंतरची सर्वात मोठी घट नोंदवली गेली आहे. चीनमध्ये मृतांची संख्या जन्मलेल्या मुलांच्या संख्येपेक्षा जास्त आहे. चीनच्या राष्ट्रीय सांख्यिकी ब्युरोच्या आकडेवारीनुसार, 2022 च्या अखेरीस देशाची लोकसंख्या 1.41175 अब्ज होती, तर 2021 मध्ये ती 1.41260 अब्ज होती.

चीनमध्ये अनेक दशकांपासून लोकसंख्या नियंत्रण धोरण लागू केले आहे. लोकसंख्या नियंत्रण उपायांमुळे देशाची लोकसंख्या कमी होत असल्याचा निष्कर्ष काढला जात आहे.

(China’s population dips for 1st time since 1960)

China Population
Don Dawood Ibrahim: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने केले दुसरे लग्न, पाकिस्तानमधील राहते घरही बदलले

लोकसंख्येतील घट, वृद्ध लोकांची लोकसंख्या आणि लोकसंख्याशास्त्रीय बदल टाळण्यासाठी, चिनी सरकारने अनेक धोरणं लागू केली आहेत. सन 2021 मध्ये, चीनमध्ये 1000 लोकांमागे 7.52 मुले असा जन्मदर दर होता, परंतु गेल्या वर्षी तो 1000 लोकांमागे 6.77 मुलांपर्यंत कमी झाला आहे.

2022 च्या सुरूवातीला भारताची लोकसंख्या 1.417 अब्ज नोंदविण्यात आली, तर चीनची लोकसंख्या 1.4126 होती. 2050 सालापर्यंत चीनची लोकसंख्या 1.3 अब्जने कमी होईल, असे UN च्या अहवालात म्हटले आहे.

China Population
Covid-19 प्रिकॉशनरी डोस घेतला का? गोव्यात 11 ठिकाणी सोय, जाणून घ्या तुमच्या येथे कोठे मिळेल मोफत लस

ब्रिटनला मागे सारत भारत आता जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या अहवालानुसार, 2028 पर्यंत भारत जपान आणि जर्मनीला मागे टाकून तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. तसेच, अनेक बाबींमध्ये भारत चीनला मागे टाकत त्यांच्या पुढे जाऊ शकते. अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

चीनबद्दल बोलायचे तर तिथे घटत्या लोकसंख्येचा परिणाम आतापासूनच दिसू लागलेला आहे. देशाची अर्थव्यवस्था आधीच कमकुवत झाली असून, सरकारच्या झिरो कोविड धोरणामुळे बाजारावर देखील परिणाम झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com