China's deep-Earth exploration: चिनी वैज्ञानिक पृथ्वीवर खोदतायेत 10,000 मीटर खोल खड्डा, पण कारण काय?

चीन या छिद्राच्या मदतीने पृष्ठभागाच्या वर आणि खाली विविध नवीन शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे.
China's deep-Earth exploration
China's deep-Earth explorationBloomberg

China's deep-Earth exploration: चीनमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. चिनी वैज्ञानिक पृथ्वीच्या कवचात 10,000 मीटर म्हणजेच 32,808 फूट खोल खड्डा खोदत आहेत. चीनच्या शिनजियांग प्रांतात शास्त्रज्ञ हे छिद्र केला जात असून, हा भाग तेल समृद्ध प्रदेश म्हणून ओळखला जातो. असे वृत्त चीनची वृत्तसंस्था शिन्हुआने दिले आहे.

चिनी शास्त्रज्ञ पृथ्वीच्या कवचापर्यंत छिद्र पाडत आहेत. पृथ्वीच्या कवचात सापडलेल्या खडकाचे वय सुमारे 145 दशलक्ष वर्षे असल्याचे, रॉक डेटिंगद्वारे समोर आले आहे.

रशियन कोला सुपरदीप बोरहोल हे पृथ्वीवर आतापर्यंत खोदलेले सर्वात खोल मानवनिर्मित छिद्र आहे. त्याची खोली 12,262 मीटर म्हणजेच 40,230 फूट आहे. कोला सुपरदीप बोअरहोल 20 वर्षांच्या ड्रिलिंगनंतर 1989 मध्ये तयार करण्यात आला.

चीन पृथ्वीवर छिद्र का करत आहे?

शिन्हुआने प्रसिद्ध केलेल्या बातमीनुसार, चिनी वैज्ञानिकांनी पृथ्वीवर छिद्र पाडण्यास मंगळवारपासून सुरुवात केली. जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला चीन या छिद्राच्या मदतीने पृष्ठभागाच्या वर आणि खाली विविध नवीन शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे.

मंगळवारी चीनने पहिल्यांदाच एका नागरिकाला अवकाशात पाठवले आहे. गोबी वाळवंटातून एका चिनी अंतराळवीराला अवकाशात पाठवण्यात आले आहे.

China's deep-Earth exploration
Brij Bhushan: बृजभूषण यांना तात्काळ अटक करा ; गोवा प्रदेश महिला काँग्रेसची मागणी

अशा प्रकल्पांमुळे खनिज आणि ऊर्जा संसाधने शोधण्यास मदत होऊ शकते, असे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी म्हटले आहे. तसेच, भूकंप आणि ज्वालामुखीचा उद्रेक यांसारख्या पर्यावरणीय आपत्तींच्या जोखमींचे मूल्यांकन करण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरू शकेल. असे जिनपिंग म्हणाले.

तर, हा प्रकल्प पृथ्वीच्या अंतर्गत संरचनेची माहिती देईल, असे या प्रकल्पाचे नेतृत्व करणाऱ्या चायना नॅशनल पेट्रोलियम कॉर्पने म्हटले आहे. या प्रकल्पाच्या खोदकामासाठी 457 दिवस लागतील. असे म्हटले जात आहे.

China's deep-Earth exploration
Vande Bharat Train: मुंबई - गोवा वंदे भारत ट्रेनला 'कुडाळ' येथे थांबा नाही, लोक नाराज; राणेंनी सांगितले कारण

अशी असते पृथ्वीची अंतर्गत रचना

पृथ्वीची अंतर्गत रचना तीन भागात विभागलेली आहे. पृथ्वीच्या आत तीन भाग आहेत - वरचा पृष्ठभाग किंवा पृथ्वीचे कवच (क्रस्ट), मध्य भाग (कोअर) आणि आवरण (आवरण). पृथ्वीच्या वरच्या भागाला पृथ्वीचे कवच म्हणतात. पृथ्वीच्या कवचाची जाडी सुमारे 3 ते 40 किमी मानली जाते. हे प्रामुख्याने बेसाल्ट आणि ग्रॅनाइटचे बनलेले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com