चीनचा अजब दावा; राष्ट्राध्यक्ष जिनपिंग म्हणाले...

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 25 फेब्रुवारी 2021

 चीन सरकारने चीनमधील करोडो गरीब लोकांना गरिबीच्या खाईतून बाहेर काढले आहे.

बिजींग: जगभरात कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे जागतिक रोषाला सामोरे जाणाऱ्या चीनमध्ये एक चमत्कारिक गोष्ट घडवून आणल्याची राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी घोषणा केली आहे. जगभरात कोरोना महामारीमुळे लोकांचे व्यवसाय ठप्प झाले, अनेकांच्या नोकऱ्यांवर गंडातर आले मात्र ‘’चीन सरकारने चीनमधील करोडो गरीब लोकांना गरिबीच्या खाईतून बाहेर काढले आहे. आत्तापर्यंत कोणत्याच देशाला हे जमले नाही. हा एक मानवी चमत्कारच असून इतिहासामध्ये नोंद करण्यासारखे आहे,’’ असं राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी सांगितले आहे. चीनने गेल्याच वर्षी दावा केला होता की, आपल्या देशातील नागरिकांना 2.30 डॉलर उत्पन्न असणाऱ्या दरडोई दारिद्र रेषेच्या वर आणण्यासाठी मोठे कार्य केले आहे.

जो बायडन प्रशासनाने बदलला अमेरिकेचा नागरिकत्व कायदा; 1 मार्चपासून होणार लागू

 2015 मध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी चीनमधील 2020 पर्यंत गरिबी निर्मूलनाची शपथ घेतली होती. कम्युनिस्ट पक्षाच्या 100 व्या वर्धापन दिनानिमित्त ‘’मध्यम स्वरुपी समाज'', निर्माण करण्याचे हे उद्दिष्ट आहे. अंतीम मुदतीच्याआधीच चीन सरकारने रस्ते आणि पायाभूत सुविधांमध्ये कोट्यावधी युआनची गुंतवणूक करण्यात आली आहे. त्याचबरोबर चीनमधील गरिब लोकांना कर सवलती आणि अनुदाने देण्यात आली आहेत.  चीनने 1970 नंतर बाजारसुधारणांकडे लक्ष दिल्यानंतर 800 दशलक्षहून अधिक लोकांना गरिबीच्या खाईतून बाहेर काढले आहे.
 

संबंधित बातम्या