चीनी डॉक्टरचा गौप्यस्फोट; शत्रू देशांची आरोग्य व्यवस्था बिघडवण्यासाठी कोरोनाची निर्मिती

चीनी डॉक्टरचा गौप्यस्फोट; शत्रू देशांची आरोग्य व्यवस्था बिघडवण्यासाठी कोरोनाची निर्मिती
Chinese doctors assassination Creation of corona to disrupt the health system of enemy countries

जगभरात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागाला आहे. कोरोना महामारीच्या पूर्वीपासूनच चीन (China) तिसऱ्या महायुध्दाची तयारी करत आहे आणि विशेष म्हणजे या महायुध्दासाठी चीनचा कोरोना व्हायरस बनवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप अमेरिकेकडून केला जात होता. यासंदर्भातच चीनच्या व्हायलॉजिस्ट डॉ. लींग मेंग (Dr Li-Meng) यांनी माध्यमांशी संवाद साधला. या संवादामधून अनेक महत्त्वाचे खुलासे समोर आले आहेत.

अमेरिकेतील (America) माध्यमांनी प्रसिध्द केलेल्या एका अहवालाबद्दल बोलताना मेंग म्हणतात, जगावर अधिराज्य गाजवण्यासाठी चीन बायोवेपन वापरण्याच्या चीनच्या कटाविरुध्दचा पुरावा म्हणून या अहवालाकडे बघितले जाऊ शकते. जेव्हा कोरोनासारखा विषाणू जेव्हा लॅबमधून बाहेर आला तेव्हा जगभरातील देशांची दिशाभूल करण्यासाठी चुकीची माहीती नाकारणं आणि त्या खतरनाक बायोवेपनचा वापर करणं हा त्या मागचा उद्देश आहे. (Chinese doctors assassination Creation of corona to disrupt the health system of enemy countries)

त्या पुढे म्हणतात, मी मागील वर्षापासून सागंत आहे कोरोनाचा विषाणू पीएलए लॅबमधून (PLA Lab) आला आहे आणि विषाणूच्या शोधासाठी चीनने मोठी गुंतवणूक केली आहे. त्यांना मोठ्या संशोधनामोधून लोकांना हानी पोहचवणारा हा विषाणू सापडला आणि तो त्यांनी जगभरात पोहचवला. चीनी सरकारला हे चांगलचं माहिती आहे आणि म्हणूनच काही दिवसांमध्ये त्यांना जगभरात मोठा परिणाम दिसू लागला.

या विषाणूची निर्मीती शत्रू देशांची वैद्यकीय व्यवस्था ढासळावी यासाठी पसरवण्यात आला असल्याचा गंभीर आरोप अमेरिकेने सादर केलेल्या अहवालात म्हटलं आहे. त्याविषयी बोलताना, डॉ. मेंग यांचा दावा नक्कीच खरा ठरणारा मानला जात आहे. या अनियंत्रित अशा बायोवेपनचा वापर करुन शत्रूराष्ट्रांची आरोग्य व्यवस्था संपवण्याचा प्रयत्न आहे. या बोयवेपनने जास्त लोकांचा मृत्यू होणार नाही मात्र त्या त्या देशातील आरोग्य़ व्यवस्था पूर्णपणे उध्दवस्त होईल आणि हाच उद्देश हा विषाणू पसरवण्या मागे आहे. गेल्यावर्षी चीनमधील वुहान शहरात या घातक विषाणूची चाचणी करण्यात आली. आणि जगभरात एकच गोंधल उडाला.

दरम्यान, चीनी माध्यमांनी ह्या अहवालाला कोणत्याही प्रकारचा आधार नसल्याचा दावा केला आहे. त्याबद्दल डॉ. मेंग यांना विचारलं असता, चीनी सरकारकडून देण्यात आलेला प्रतिसाद हा पाठ्यपुस्ताकामधूनही सांगण्यात आला आहे. मात्र ही माहीती पूर्णपणे चुकीची आहे. आपल्या स्पष्टीकरणावर चीन सरकार म्हणते, या विषाणूचं स्वरुप ओळखायचं असेल तर या विषाणूचा उत्क्रांतीच्या इतिहासाशी संबंध जोडून पहायला हवा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com