चीन सरकारने केली आपल्याच पत्रकारांवर कारवाई...

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

चीन सरकारला सैन्य माघार घेण्याबाबत अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागत आहेत.चीन सरकारने पत्रकार शू झिमिंग यांना शनिवारी नानजिंगमधून अटक केली आहे.

बिजींग: पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्यात सीमाविवाद निर्माण झाला होता. सीमाविवादाबाबत तोडगा काढण्य़ासाठी  भारत आणि चीन यांनी अनेक वेळा चर्चाही केल्या.अखेर गलवान खोऱ्यातून सैन्य माघार घेण्यावर दोन्ही देशामध्ये एकमत झाले, आणि सैन्य माघार घेण्यास सुरुवातही झाली. मात्र आता चीन सरकारला सैन्य माघार घेण्याबाबत अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागत आहेत.

गलवान खोऱ्यात भारतीय जवान आणि चीनच्या पिपल्स आर्मीमध्ये रक्तरंजित संघर्ष निर्माण झाला होता. यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले होते, तर चीनने आपले किती सैनिक मारले गेले याची आकडेवारी खूप उशिरा दिली. या संघर्षामधील चीनच्या अधिकृत भूमिकेबद्दल प्रश्न उपस्थित करणाऱ्या तीन चीनी पत्रकारांविरोधात चीन सरकारकडून कारवाई करण्यात आल्याचे वृत्त आले आहे. चीन सरकारने पत्रकार शू झिमिंग यांना शनिवारी नानजिंगमधून अटक केली आहे.

मेक्सिकन एअरफोर्सचे विमान कोसळले; 6 सैनिक ठार

गलवान खोऱ्य़ातील संघर्षात शहीद झालेल्या चीनच्या सैनिकांना शुक्रवारी चीनी लष्काराने सन्मान घोषीत केला. या पुरस्कारप्राप्त पाच सैनिकांपैकी चार सैनिकांचा मृत्यू झाला आहे, तर एक कंमाडर्स दर्जाचा अधिकारी या संघर्षात जखमी झाला होता. चीन सरकारकडून मृतांची संख्या जाहीर केल्यानंतर त्यावर चिनी पत्रकार शू झिमिंग यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होते. भारताने गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात आपले सैनिक शहिद झालेले लगेच मान्य केले होते. मात्र चीनला हीच गोष्ट मान्य करण्यासाठी इतका वेळ का लागला असा सवाल पत्रकार शू झिमिंग यांनी उपस्थित केला आहे. आणि याच कारणामुळे चीन सरकारने त्यांना अटक केली आहे. परंतु  त्यांच्याबद्दल अद्याप तरी कोणतीही माहीती मिळू शकलेली नाही. 

संबंधित बातम्या