पूर्व लडाखमध्ये चीनी सैन्यांचा पुन्हा एकदा शिरकाव

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 1 मे 2021

पूर्व लडाखमध्ये चीनी सैन्यांनी घुसखोरी केली आहे.

देशात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील आरोग्यव्यवस्था पुरती कोलमडली आहे. त्यामुळे देशात चिंतेचं वातावरण पसरलं आहे. अशा परिस्थितीमध्ये जगभरातील अनेक देशांनी भारताला (India) मदतीचा हात पुढे केला आहे. शेजारी असणाऱ्या पाकिस्तानसंह चीनंही मदतीचा हात पुढे केला आहे. मात्र चीनचा (China) कावेबाजपणा पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. चीनच्या रेड आर्मीनं पुन्हा एकदा भारताच्या हद्दीत शिरकाव करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर आली आहे. (Chinese troops re-enter East Ladakh)

पूर्व लडाखमध्ये (East Ladakh) चीनी सैन्यांनी घुसखोरी केली आहे. त्याचबरोबर चीनी सैन्यांनी स्थायी निवास आणि डेपोची निर्मिती केली आहे. त्यामुळे भारत-चीन सीमेवर पुन्हा एकदा तणाव वाढण्याची स्थिती निर्माण होत आहे.

Kyrgyzstan Tajikistan Violence: दोन देशात पाण्यावरून वाद; 31 ठार शेकडो जखमी

या वर्षाच्या सुरुवातीलाच भारत-चीन दरम्यान तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. चीनने मोठ्याप्रमाणात सीमेवर चीनी सेना तैनात केली होती. तसेच भारतीय सीमेममध्ये सुध्दा रेड आर्मीने शिरकाव केला होता. त्यानंतर दोन्ही सैन्य दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या होत्या. मागील वर्षी मे महिन्यात भारत आणि चीन यांच्यात सीमेवरुन वादाला सुरुवात झाली होती. त्यानंतर दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये झडपही झाली होती. 15 जून 2020 मध्ये गलवान खोऱ्यात चीनी सैन्यांनी भारतीय सैन्यांवर हल्ला केला होता. त्यांनतर भारतीय सैन्य़ांनी देखील चीनी सैन्यांना जशाच तस उत्तर दिलं होतं. तर दुसरीकडे चीननं कित्येक महिने काही झालचं नसल्याचा कांगावा केला होता. मात्र अखेर सीमेवर झालेल्या झडपीमध्ये आपले काही सैन्य मारले गेल्याचं मान्य केलं होतं. या झडपीमध्ये आपले किती सैन्य मारले गेले ते अद्याप चीननं सांगितलं नाही.

कोरोनाच्या लढाईमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. तसेच मदत करण्याची घोषणा देखील केली होती. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना संदेश पाठवून संवेदनाही व्यक्त केल्या होत्या. मात्र दुसरीकडे कावेबाज चीननं पुन्हा एकदा पूर्व लडाखमध्ये आपल्या कुरापती सुरु केल्या आहेत.
 

संबंधित बातम्या