पाकिस्तानमधील कराची व लाहोर जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरं

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 डिसेंबर 2020

 जगातील सर्वाधिक प्रदूषित दहा शहरांमध्ये कराची व लाहोर यांचे नाव पुन्हा एकदा आले आहे. हवेच्या गुणवत्तेची माहिती देणाऱ्या ‘आयक्यूएअर’ या संकेतस्‍थळावर ही माहिती देण्यात आली आहे.

इस्लामाबाद  :  जगातील सर्वाधिक प्रदूषित दहा शहरांमध्ये कराची व लाहोर यांचे नाव पुन्हा एकदा आले आहे. हवेच्या गुणवत्तेची माहिती देणाऱ्या ‘आयक्यूएअर’ या संकेतस्‍थळावर ही माहिती देण्यात आली आहे. सिंध प्रांतातील प्रमुख शहर असलेल्या लाहोरचा क्रमांक या यादीत सहावा असून पंजाब प्रांतातील कराची चौथ्या क्रमांकावर आहे. मंगोलियाच्या उलनबटर या यादीत पहिल्या स्थानावर आहे. बांगलादेशमधील ढाका आणि कझाकिस्तानमधील बिश्‍केक हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहे, असे वृत्त ‘द न्यूज इंटरनॅशनल’ने दिले आहे. अमेरिकेच्या पर्यावरण संरक्षण संस्थे (यूएसइपीए)च्या निकषानुसार हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ५० पेक्षा कमी असल्यास हवेची गुणवत्ता समाधानकारक असल्याचे मानले जाते. कराची व लाहोरचा ‘पीएम’ (सूक्ष्म धूलिकण) अनुक्रमे १८३ आणि १७० असल्याची नोंद झाली असून हे प्रमाण आरोग्याला हानिकारक समजले जाते.

 

कोलकताही प्रदूषित

‘आयक्यूएअर’च्या संकेतस्‍थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्वाधिक प्रदूषित दहा शहरांमध्ये भारतातील कोलकताचाही समावेश आहे. कोलकताचा सातवा क्रमांक असून याचा ‘एक्यूआय’ १६२ आहे.

 

अधिक वाचा :

जगातील सर्वांपर्यंत कोरोना लस पोहोचण्यासाठी २०२२ उजाडणार 

 

 

संबंधित बातम्या