"महिलांच्या कपड्यांमुळेच होतात बलात्कार" पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं वादग्रस्त वक्तव्य

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 8 एप्रिल 2021

समाजमध्ये वाढणाऱ्या अश्लीलतेमुळे बलात्कारासारख्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नुकतचं एक धक्कादायक विधान केल्यामुळे नव्य़ा वादाला तोंड फुटलं आहे. इम्रान खान यांनी केलेल्या वक्तव्यामुळे स्त्रीयांच्या अधिकारासाठी लढणाऱ्या संघटनांनीही आपला आक्षेप नोंदवला आहे. इतकचं नाही तर इम्रान खान यांच्यापासून घटस्फोट घेतलेली त्यांची पत्नी जेमिमा गोल्डस्मिथ यांनी प्रकरणावरुन ट्विट केलं आहे.

मागच्या आठवड्यामध्ये मुलाखती दरम्यान इम्रान खान यांनी महिलांच्या संदर्भात वादग्रस्त विधान केलं होतं. ‘’समाजमध्ये वाढणाऱ्या अश्लीलतेमुळे बलात्कारासारख्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहे,’’ असं इम्रान खान म्हणाले. तसेच त्यांनी वाढत्या बलात्काराच्या प्रकरणांबद्दल बोलताना महिलांनी संपूर्ण कपड्यामध्ये रहायला पाहिजे असा सल्लाही यावेळी दिला. आणि याच वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं.

संसदच महिलांसाठी असुरक्षित; ऑस्ट्रेलियात हजारो स्त्रिया उतरल्या रस्त्यावर

‘’महिलांना वाईट नजरांपासून वाचवण्यासाठी इस्लामध्ये संपूर्ण शरीर झाकून वावरण्याची पध्दत आहे,’’ असही इम्रान खान यांनी म्हटले. या मुलाखती दरम्यान इम्रान खान यांना वाढत्या लैंगिक अत्याचाराला रोखण्यासाठी सत्तेत असणारं तुमचं सरकार काय काय प्रयत्न करत  आहे असा प्रश्न एका प्रेक्षकाने विचारला. त्यावर उत्तर देताना खान यांनी म्हटले, काही प्रश्न कायदेशीर मार्गाने सोडवताच येऊ शकत नाहीत. समाजाला स्वत:च अश्लिल गोष्टीपासून स्वत:चा बचाव करण्याची गरज आहे. बलात्कार आणि महीला अत्याचारासारखी प्रकरणे कॅन्सरसारखी समाजामध्ये पसरत आहेत. याच वक्तव्यावरुन महिलांचे कपडेच बलात्कारासाठी जबाबदार असतात असं सांगण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप इम्रान खान यांच्यावर केला जात आहे. त्यावरुन पाकिस्तानमधील राजकीय वातावरणही चांगलंच तापलं आहे.

इम्रान खान यांच्या वक्तव्याचा सर्व स्तरामधून निषेध होत आहे. इम्रान यांची घटस्फोटीत पत्नी जेमिमा गोल्डस्मिथ यांनी महिलांच्य़ा सुरक्षेची जबाबदारी पुरुषांची असते असं म्हटलं आहे. 

 

संबंधित बातम्या