COP-27 Summit
COP-27 SummitDainik Gomantak

COP-27 Summit: कार्बन उत्सर्जन कमी करण्यात सर्वच देश अपयशी, 'लॉस अ‍ॅण्ड डॅमेज' फंडची घोषणा

COP-27 Summit: जागतिक उत्सर्जन इतिहासातील सर्वोच्च शिखरावर पोहोचले आहे.

COP-27 Summit: हवामान बदलाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी इजिप्तमध्ये 6 ते 18 नोव्हेंबर दरम्यान आयोजित COP-27 या संयुक्त राष्ट्रांच्या 27 व्या परिषदेतून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. वृत्तसंस्था एएफपीने संयुक्त राष्ट्राच्या हवाल्याने म्हटले की, कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी गेल्या बैठकीत घेतलेला ठराव पूर्ण होऊ शकला नाही. जागतिक उत्सर्जन इतिहासातील सर्वोच्च शिखरावर पोहोचले आहे.

तथापि, सर्व नेत्यांनी पुन्हा एकदा वेगाने कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे वचन दिले, तसेच ''लॉस अ‍ॅण्ड डॅमेज' नावाच्या फंडची घोषणा करण्यात आली आहे. या निधीच्या माध्यमातून हवामान बदलाची समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

COP-27 Summit
SCO Summit 2022: गलवान संघर्षानंतर PM मोदी अन् शी जिनपिंग आमनेसामने, पुतीन यांच्यासोबतही द्विपक्षीय बैठक

लॉस अ‍ॅण्ड डॅमेज निधी म्हणजे काय ते जाणून घ्या

27 व्या संयुक्त राष्ट्र परिषदेत (COP27), सर्व देशांच्या प्रतिनिधींनी 'लॉस अ‍ॅण्ड डॅमेज' फंड स्थापन करण्यास सहमती दर्शविली आहे. हा निधी हवामान बदलामुळे असुरक्षित असलेल्या विकसनशील देशांना झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यास मदत करेल.

COP-27 Summit
Quad Summit 2022: PM मोदी राहणार उपस्थित, क्वाड म्हणजे काय अन् चीन का घाबरतो?

Cop27 एका दिवसासाठी वाढवला

इजिप्तमधील (Egypt) COP27 शिखर परिषद हवामान बदलाच्या मुद्द्यांवरुन गतिरोधक निर्माण झाला असताना एका दिवसाने वाढवण्यात आली आहे. यातच केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले की, संयुक्त राष्ट्रांच्या (United Nations) हवामान चर्चेचा कालावधी आणखी एका दिवसाने वाढवण्यात आला आहे. COP27 परिषद शुक्रवारी संपणार होती, परंतु इथे सुरु असलेली चर्चा त्यांच्या तार्किक समाप्तीकडे नेण्यासाठी ती एक दिवसाने वाढवण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com