वीस मिनिटांत कोरोना रक्त चाचणी

Avit Bagle
शनिवार, 18 जुलै 2020

ऑस्ट्रेलियातील मोनाश विद्यापीठाचे संशोधन

सिडनी

केवळ २० मिनिटांत कोरोना विषाणू संसर्गाचे निदान करणारी रक्त चाचणी ऑस्ट्रेलियातील मोनाश विद्यापीठातील संशोधकांनी विकसित केली आहे. जगातील हे पहिलेच संशोधन असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

संशोधनाची वैशिष्ट्ये
- पूर्वी संसर्ग झाला आहे का याचेही निदान
- अल्पकालीन उपायांचा अवलंब करण्याची संधी
- रुग्ण वेगाने शोधणे शक्य
- संसर्ग रोखण्यासाठी रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी शक्य
- दीर्घकालीन उपाययोजना लागू करणे सोयीचे
- विशिष्ट परिसरातील संसर्गाची तीव्रता ठरविण्यासाठी चाचण्या घेणे शक्य
- ‘एसीएस सेन्सर्स जर्नल’मध्ये शोधनिबंध प्रकाशित
- बायोप्रिआ व मोनाश विद्यापीठाच्या रासायनिक अभियांत्रिकी विभाग यांच्या संयुक्त संशोधन पथकाचे संशोधन
- कॉन्व्हर्जंट बायोनॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या एआरसी नैपुण्य केंद्राचे संशोधकही सहभागी
- पेटंटसाठी अर्ज प्रक्रिया सुरु
- चाचणी साहित्य उत्पादनासाठी व्यावसायिक आणि सरकारी पाठिंबा मिळविण्यासाठी संशोधक प्रयत्नशील

असे झाले संशोधन
- रक्ताच्या नमुन्यांमधील २५ मायक्रोलीटर प्लाझ्माचा वापर
- कोरोनामुळे उद्भवणाऱ्या लक्षणांचे निदान
- लाल रक्तपेशींचे प्रसमूहन एकत्रीकरण (अॅग्युल्टीनेशन) किंवा त्यांचे पुंजके (क्लस्टरिंग) जमा होतात का याची तपासणी
- स्वॅब चाचणीमुळे सध्या संसर्ग झाला आहे का याचे निदान करता येते
- लाल रक्तपेशींमधील प्रसमूहनाचे पृथक्करण केल्यास रक्तातील विशिष्ट पदार्थाचे अस्तित्व तपासणे शक्य
- संसर्ग बरा झाला असला तरी पूर्वी होऊन गेला आहे का हे ओळखता येते

संशोधनाचे फायदे
- दर तासाला रक्ताचे शेकडो नमुने तपासण्याची सुविधा
- प्रयोगशाळेतील चाचण्यांत मदत होऊ शकणार
- लस टोचल्यानंतर शरीरात निर्माण होणाऱ्या प्रतिपिंडाची (अँटीबॉडीज) चाचणी घेण्याची आशा

 

संबंधित बातम्या