अमेरिकेतील कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

वॅाशिंग्टन: आरोग्य तज्ञांनी व्यक्त केलेल्या भीतीनुसार अमेरिकेतील कोरोना विषाणूमुळे  मृत्युमूखी पडणाऱ्या रूग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे.

वॅाशिंग्टन: आरोग्य तज्ञांनी व्यक्त केलेल्या भीतीनुसार अमेरिकेतील कोरोना विषाणूमुळे  मृत्युमूखी पडणाऱ्या रूग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे. मागच्या आठवड्यात राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी, "आम्ही चांगले काम करत आहोत, ही परिस्थिती लवकरच निवळेल", असं आश्वासन दिलं होतं, परंतु प्रत्यक्षात मात्र देशातील प्रत्येक भागात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे.

निवडणुकीला अवघा आठवडा शिल्लक असताना, देशभरात दररोज होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण गेल्या दोन आठवड्यांत 10 टक्क्यांनी वाढले आहे, दररोज नवीन कोरोना संसर्ग होणाऱ्या रूग्णांच्या संख्येत 47 राज्यांत, तर 34 राज्यांत दररोज मृत्युमुखी पडणाऱ्या रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

आरोग्य तज्ञांनी असा इशारा दिला होता की, कोरोना रूग्णांच्या घटनांमध्ये विक्रमी वाढ झाल्याने मृतांची संख्यादेखील वाढू शकते. कारण कोरोनाची लागण होऊन रूग्णाचा मृत्यू होण्यास अवघे काही आठवडे लागतात.

संबंधित बातम्या