Corona: चीनने फोटो शेअर करत केला भारताचा अपमान

गोमंन्तक वृत्तसेवा
सोमवार, 3 मे 2021

चीनच्या टॉप लॉ इंफोर्समेंट संस्‍थेने टिआन्हे नावाच्या या मॉडलच्या लॉन्चिंगचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यात रॉकेटमधून आग निघाल्याचे दिसत होते. त्यांनी पोस्टमध्ये शेअर केलेल्या रॉकेटच्या आगीची तुलना भारतात वाढत असलेल्या कोरोना संक्रमणामुळे झालेल्या मृतांच्या अत्यंसंस्काराशी केली.

बीजिंग:अलीकडेच, चीनने आपल्या पहिल्या स्थायी स्पेस सेंटरसाठी मुख्य मॉडल लॉन्च केले आहे. या अंतराळ केंद्राचे बांधकाम पुढील वर्षाच्या अखेरीस पूर्ण करण्याचे चीनचे उद्दीष्ट आहे. हे चीनसाठी मोठे यश ठरणार आहे. पण या यशाच्या पार्श्वभूमीवर चीनने एक अपमानकारक फोटो शेअर केला आहे. हे मॉडल लॉन्च होताना चीनने भारतात कोरोनाव्हायरसच्या वाढत्या प्रसाराबद्दल भारताचा अपमान केला आहे. त्यानंतर झालेल्या वादानंतर आणि टीकेनंतर सोशल मीडियावरून ही अपमानास्पद पोस्ट डीलीट करण्यात आली.(China on Coronavirus in India)

मिळालेल्या माहितीनुसार चीनच्या टॉप लॉ इंफोर्समेंट संस्‍थेने टिआन्हे नावाच्या या मॉडलच्या लॉन्चिंगचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यात रॉकेटमधून आग निघाल्याचे दिसत होते. त्यांनी पोस्टमध्ये शेअर केलेल्या रॉकेटच्या आगीची तुलना भारतात वाढत असलेल्या कोरोना संक्रमणामुळे झालेल्या मृतांच्या अत्यंसंस्काराशी केली. 'चीन आग लावत आहे vs भारत आग लावत आहे', असे कॅप्शन त्यांनी त्या पोस्ट ला दिले होते. (Corona China insults India by sharing photos)

शनिवारी चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय राजकीय व कायदेशीर व्यवहार आयोगाने सिन वीबोच्या अधिकृत खात्यावर ही पोस्ट टाकली होती. यात भारतात कोरोना संसर्गाशी संबंधित हॅशटॅग देखील होता. सिन वीबो हे चीनी मायक्रोब्लॉगिंग सोशल मीडिया साइट आहे. चिनी सोशल मीडिया वापरकर्त्यांनी आक्रोश व्यक्त केल्यानंतर ही पोस्ट रविवारी डीलीट करण्यात आली.

उत्तर कोरिया अमेरिकेवर भडकला; परिणाम भोगायला तयार राहा 

जेव्हा यासंदर्भात चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाला विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी “आम्हाला आशा आहे की सर्व देशभर पसरलेल्या कोरोना महामारीच्या बाबतीत भारताच्या मदतीबाबत चिनी सरकारकडे लक्ष दिले जात आहे. कोरोनाविरूद्धच्या लढाईत भविष्यात आणखी महत्वाच्या गोष्टी भारतात पाठविल्या जाईल. असे उत्तर दिले.

त्याच वेळी, चिनी सरकारच्या ग्लोबल टाईम्सचे मुख्य संपादक हू शिजिन यांनी हटवलेल्या पोस्टवर एक टिप्पणी केली, ज्यात "अधिकृत सोशल मीडिया अकाउंट्सने यावेळी मानवतावाद अधिक संवेदनशीलतेचा विचार करायला हवा, भारताबद्दल सहानुभूती दर्शवायला हवी," असे म्हटले आहे.

संबंधित बातम्या