‘’कोरोनाला रोखता आलं असतं पण... आंतराष्ट्रीय तज्ञांच्या गटानं ओढले ताशेरे!

गोमंन्तक वृत्तसेवा
बुधवार, 12 मे 2021

चुकीच्या निर्णयांमुळे आणि कोरोनाच्या सुरुवातीच्या इशाऱ्यांकडे कानाडोळा केल्यामुळेच कोरोनाचा प्रदुर्भाव वाढला.

जगभरात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला असताना ‘’सुरुवातीच्या काळामध्ये कोरोनाला रोखता आलं असतं. परंतु लागोपाठ घेण्यात आलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे आणि कोरोनाच्या सुरुवातीच्या इशाऱ्यांकडे कानाडोळा केल्यामुळेच कोरोनाचा प्रदुर्भाव वाढला आणि आजपर्यंत या विषाणूनं जगभरात 33 लाख लोकांचा जीव घेतला आहे,’’ अशा कठोर शब्दांमध्ये आंतरराष्ट्रीय तज्ञांच्या गटाने जगभरातल्या सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेतच्या (WHO) धोरणावरही अगदी परखडपणे टीका केली जाते. WHO नंच नेमलेल्या इंडिपेंडंट पॅनल पॅंडेमिक प्रिपेर्डनेस अ‍ॅड रिस्पॉन्स अर्थात IPPPR च्या गटाने ही निरिक्षणं नोंदवली आहेत. (Corona could have been stopped but  Tashree was pulled by a group of international experts)

‘’जगातील अनेक देशांसोबतच जागतिक आरोग्य संघटनेनं चीनमधल्या वुहानमध्ये झालेल्या सुरुवातीच्या कोरोना प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष केलं. त्याकडे लक्ष देऊन तातडीने पावलं उचलण्यात हे देश कमी पडले  आणि त्याचा परिणाम म्हणून फेब्रुवारी 2020 मध्ये कोरोनाचा प्रसार पूर्ण जगभरात पसरला. या संदर्भातील इशाऱ्याकडे लक्ष देण्यात अनेक देश कमी पडले,’’ अशा कठोर शब्दांमध्ये अहवालात ताशेरे ओढले.  

''...यामुळे भारतातील कोरोनाची परिस्थिती इतकी वाईट !’’ डॉ. फौचींनी...

‘’जगभरातील देशांना नागरिकांचं संरक्षण करण्यात अपयश आलं असून विज्ञानाकडे दुर्लक्ष करणाऱ्या नेत्यांनी जनतेचा सार्वजनिक व्यवस्थेवरचा विश्वास उडवला,’’ असं देखील अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

दरम्यान, ‘’कोरोना महामारीसारख्या संकटासाठी तयारी करण्यात आलेली दिरंगाई, अपयश आणि निर्णयांमध्ये असलेल्या त्रुटी यामुळे या भयंकर संकटाचं गांभीर्य वाढलं,’’ अस देखील या अहवालात म्हटलं आहे. चुकीच्या निर्णय आणि नियोजनाचा अभाव यामुळे एक विषारी कॉकटेल तयार झालं आणि त्यातून प्रादुर्भाव वाढला,’’ असं अहवालात म्हटलं आहे.
 

संबंधित बातम्या