चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव

Corona infiltration again in China
Corona infiltration again in China

बीजिंग : चीनमध्ये (China) कोरोना (Corona) विषाणू पुन्हा एकदा आपले पाय पसरू लागला आहे. चीनच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गुआंगदोंग (Guangdong) शहरांमध्ये कोरोना विषाणूच्या घटना वाढत असल्याने तेथे लॉकडाऊन (Lockdown) अधिक कडक करण्यात आले आहे. 

गुआंगदोंगमधील शहरांना जोडणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. इतर देशांमधून चीन प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांसाठी कोरोना चाचणीचा अहवाल अनिवार्य करण्यात आला आहेत. स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करणे सुरु केले आहे.

याआधी चीनने कोरोना संक्रमणामध्ये वाढ झाल्यामुळे त्यांच्या दक्षिण प्रांतातील गुआंगदोंगमध्ये बंदी घातली आहे. शहरा बाहेर जाणाऱ्यांसाठी कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली असून, नवीन प्रकरणे वाढत असल्याने हे पाऊल उचलले गेले आहे. नॅशनल हेल्थ कमिशनने (National Health Commission) बुधवारी सांगितले आहे की, चीनमध्ये 1 जूनपासून 10 प्रकरणे समोर आली आहेत. यात राजधानी ग्वंनझोऊमध्ये सात आणि जवळच्या फॉशन शहरात तीन आहेत. तर हाँगकाँगला लागून असलेल्या या  गुआंगदोंगमध्ये आतापर्यंत कोरोनाच्या 41 नव्या घटना समोर आल्या असून, ही धोक्याची घंटा आहे. जगातील इतर ठिकाणी आढळणार्‍या नवीन घटनांच्या तुलनेत ही संख्या जरी कमी असली तरी चिनी अधिकारी कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये वाढ होणार नाही याकडे लक्ष ठेऊन आहेत. कारण या देशात कोरोनाला अंकुश लावल्याचा दावा चीन सरकारकडून करण्यात आला होता.  

ग्वंनझोऊ आणि फोशान शहरांमध्ये वाढत्या संसर्गामुळे सरकारने येथील नियम कडक केले आहेत. येथून येणारी एकूण 519 विमाने रद्द करण्यात आली आहेत. शहरातील पाच भागात लोकांना घरात राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व बाजारपेठा व सार्वजनिक स्थळे बंद करण्यात आली आहेत.
गुआंगदोंगची प्रांतीय राजधानी ग्वंनझोऊ येथे मोठ्या प्रमाणात लोकांचे प्रदर्शन केले जात आहे. शनिवारपासून सव्वा कोटी लोकसंख्या असलेल्या या शहराच्या एका भागात लॉकडाउन आहे. चीनमध्येच डिसेंबर 2019 मध्ये कोरोना विषाणूची पहिली घटना समोर आली होती. आतापर्यंत चीनमध्ये कोरोनाचे एकूण 91 हजाराहून अधिक रुग्ण आढळले असून, 4,636 लोकांचा बळी गेला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com