रशियाने तयार केली प्राण्यांसाठीची कोरोना प्रतिबंधक लस

दैनिक गोमंतक
बुधवार, 31 मार्च 2021

विशिष्ट प्राणी प्रजाती कोरोनाला बळी पडत असल्याचे वेगवेगळ्या प्रकरणांतून दिसून आल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीमधून समोर आले होते. 

कोरोना विषाणू आणि त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अवघ्या जगातील लोक चिंतेत आहेत. फक्त माणसांनाच नाहीत तर प्राण्यांना सुद्धा कोरोना होऊ शकतो असे प्राण्यांची कोरोना चाचणी केल्यावर समोर आले होते.  प्राण्यांना होणाऱ्या कोरोना विषाणू संसर्गाशी लढण्यासाठी जगात पहिल्यांदाच कोरोना लस तयार करण्यात आली आहे. रशिया मध्ये ही लस तयार केल्याची नोंद झाली असल्याची माहिती फेडरल सर्व्हिस फॉर वेटरनरी अँड फायटोसॅनेटरी सर्व्हेलन्सचे उपाध्यक्ष कोन्स्टँटिन सवेनकोव्ह यांनी बुधवारी दिली आहे. (Corona preventive vaccine was invented for animals)

फेडरल सेंटर फॉर अ‍ॅनिमल हेल्थद्वारे ने विकसित केलेली मांसाहारी प्राण्यांसाठी कोरोनाव्हायरस इन्फेक्शन  एक सर्बेट अक्रिएटिव्ह लस कार्निव्हक-कोव्ह, रशियामध्ये तयार झाल्याची नोंद केली गेली आहे. प्राण्यांमध्ये होणाऱ्या कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी तयार झालेली आत्तापर्यंतची ही जगातली पहिली लस आहे. माध्यमांना मिळालेल्या माहिती नुसार  एप्रिलच्या सुरुवातीच्या काळात कोविड विरूद्ध जगातील पहिल्या प्राण्यांच्या लसीचे उत्पादन पशुवैद्यकीय उत्पादने  तयार करणाऱ्या कंपन्यांच्या आधारे केले जाऊ शकते. फेडरल सेंटर फॉर अ‍ॅनिमल हेल्थ चे कोन्स्टँटिन सवेनकोव्ह यांच्या म्हणण्यानुसार, कार्निवाकच्या क्लिनिकल चाचण्या गेल्या ऑक्टोबरमध्ये सुरू झाल्या होत्या आणि त्यात कुत्री, मांजरी, कोल्हा या प्राण्यांचा समावेश होता. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या (who) म्हणण्यानुसार, विशिष्ट प्राणी (Animals) प्रजाती कोरोनाला बळी पडत असल्याचे वेगवेगळ्या प्रकरणांतून दिसून आले आहे. जगातील विविध प्राण्यांमध्ये या आजाराची प्रकरणे नोंदली गेली आहेत. दर आठवड्यात  जागतिक आरोग्य संघटना फेडरल सेंटर फॉर एनिमल हेल्थला (Federal Center For Animal Health) प्राण्यांच्या कोरोना संसर्गाच्या बाबतीत माहिती देते. गेल्या आठवड्यात या संस्थेला मेक्सिकोमध्ये अशा तीन आणि ब्राझीलमधील एका प्रकरणांची माहिती मिळाली होती.

पाकिस्तानलाही भारताशी शांततापूर्ण संबंध हवेत; इम्रान खान यांचे नरेंद्र...

संबंधित बातम्या