Corona Vaccination : विषाणूच्या नवीन प्रकारापासून बचावासाठी हा पर्याय...

Corona Vaccination : विषाणूच्या नवीन प्रकारापासून बचावासाठी हा पर्याय...
who.jpg

जेनेव्हा : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना(corona)  लसीकरणावर(Vaccination) जोर देच म्हणले आहे, विषाणूच्या (Virus) नवीन प्रकारापासून बचावासाठी लसीकरण हा एकच पर्याय आहे. जोपर्यंत 80 टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण होत नाही, तोवर कोरोनाचा धोका कमी होणार नाही. अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या एका आधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे. (Corona Vaccination This is an alternative to the new strain of the virus)

जागतिक आरोग्य संघटनेचे  इमरजेंसी चीफ डॉक्टर माइकल रयान (Dr. Michael Ryan) हे एका पत्रकार परिषदेत म्हणाले, कोरोनाला रोखण्यासाठी जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करणे गरजेचे आहे. जोवर 80 टक्के लोकांचे लसीकरण होत नाही, तोवर कोरोनाचे वेगवेगळे प्रकार कमी होणार नाहीत. काही देशात आता लहान मुलांचे देखील लसीकरण करण्यात येत आहे. गेल्या महिन्याच्या शेवटी जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आले होते, कोरोनाच्या बदलत्या स्वरुपावर लस प्रभावी ठरु शकते. पण भविष्यात या बदलत्या प्रकारावर लस उपयोगी ठरेलच अशी शाश्वती देण्यास मात्र जागतिक आरोग्य संघटनेचे महानिदेशक टेड्रोस अधनम घेब्रेसस यांनी नकार दिला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन (Soumya Swaminathan) यांनी सांगितले, भारतात नुकसान करणारा डबल म्यूटेंट हा कोरोना विषाणू जास्त हानिकारक आहे. पण लसी या बदललेल्या विषाणूवर देखील योग्य प्रभावी आहेत. भारतात सप्टेंबरपर्यंत कमीत कमी 10 टक्के लोकांचे लसीकरण करणे गरजेचे आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com