Corona Virus : अमेरिकन तज्ञाने चीनकडे मागितल्या 'वुहान' लॅबमधील स्टाफच्या नोंदी

wuhan lab.jpg
wuhan lab.jpg

वॉशिंग्टन : कोरोना (Corona) विषाणूमुळे गेल्या दीड वर्षांपासून जगभरात हाहाकार माजला आहे. कोट्यावधी लोक कोरोनाने बाधित झाले, तर लाखो लोकांनी आपला जीव गमावला. हा विषाणू चीनने (China) लॅबमध्ये बनविल्याचा चीनवर आरोप आहे. यातच आता अमेरिकेच्या एका सुप्रसिद्ध तज्ञाने चीनला कोरोना विषाणूच्या उत्पत्तीशी संबंधित पुराव्याबाबत विचारणा केली आहे. अमेरिकन तज्ज्ञ डॉ. अँथनी फॉसी (Dr. Anthony Fauci) यांनी वुहान प्रयोगशाळेच्या (Wuhan Lab) तीन कर्मचार्‍यांच्या वैद्यकीय अहवालाच्या नोंदी चीनला विचारल्या आहेत. हे सर्वजण 2019 मध्ये खरेच आजारी पडले  होते का, असे त्यांने विचारले आहे. जर ते आजारी पडले होते तर त्यांना कोणता आजार झाला होता.  

डॉ. अँथनी फॉसी हे अमेरिकेचे (America) अध्यक्ष जो बाइडेन यांचे मुख्य वैद्यकीय अधिकारी असून, त्यांनी चीनला तीन लोकांची वैद्यकीय नोंदी जाहीर करण्यास सांगितले आहे. फाइनेंशियल टाईम्सच्या अहवालानुसार डॉ.फॉसी यांचा असा अंदाज आहे ,या लोकांच्या आजारांमुळे वूहानमधील लॅबमधून कोरोना विषाणू प्रथम बाहेर पडला. आणि तो जगभर पसरला.

कोरोना विषाणूच्या उत्पत्तीसंदर्भात जगभरात बरेच वाद आहेत. अमेरिकन गुप्तचर संस्था वूहानमधील चिनी प्रयोगशाळेतील संशोधक 2019 मध्ये कोरोनामुळे गंभीर आजारी पडल्याच्या अहवालांची तपासणी करीत आहेत. 

दरम्यान, संशोधक आजारी असल्याचा आणि लॅबमधून विषाणूची गळती झाल्याच्या आरोपाचे खंडण केले आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की, वुहानमध्ये येण्याआधी हा विषाणू इतर भागात पसरला होता. हा विषाणू चीनमध्ये बाहेरून येणाऱ्या अन्नाच्या शिपमेंटमधून किंवा जंगली प्राण्यांच्या माध्यमातून पसरला असावा. डॉ. फॉसीने सांगितले की, कोरोना विषाणू प्रथम प्राण्यांद्वारे मानवांमध्ये पसरला होता याची पुन्हा नव्याने तपासणी करणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे त्याची चौकशी पुढे सुरूच ठेवली पाहिजे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com